मुंबई । अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना शिवसेनेकडून विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आल्याचं वृत्त असतानाच काँग्रेसनेही त्यांना विधान परिषदेसाठी विचारणा केली होती. पण त्यांनी राज्यसभेसाठी इच्छूक असल्याचं सांगत नकार दिल्याचा गौप्यस्फोट काँग्रेस नेते आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला.
आम्ही उर्मिला मातोंडकर यांना संपर्क साधून विधान परिषदेवर जाण्याची ऑफर दिली होती. पण त्यांनी नकार दिला. राज्यसभेसाठी इच्छूक असल्याचं त्या म्हणाल्या. आता जर त्यांनी शिवसेनेची ऑफर स्वीकारली असेल तर त्याचं त्यांना स्वातंत्र्य आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.
उर्मिला मातोंडकर आमच्या लोकसभेच्या उमेदवार होत्या. त्या मराठी असून त्यांनी कंगना रनौतच्या विरोधात घेतलेल्या भुमिकेमुळे त्यांना विधानपरिषदेवर घ्यावं असं शिवसेनेला वाटणं स्वाभाविक आहे, असं त्यांनी सांगितलं.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in