हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Adani Group : आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या गौतम अदानी यांनी आज वयाची 60 वर्ष पूर्ण केली आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेयर इंडेक्समध्ये देखील अदानी 8व्या स्थानावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती $92.7 अब्ज एवढी आहे. अदानी ग्रुपच्या लिस्टेड कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये झपाट्याने वाढ झाल्यामुळे त्यांचा समावेश टॉप 10 अब्जाधीशांच्या क्लबमध्ये झाला.
हे लक्षात घ्या कि, Adani Group ची सुरुवात 1988 मध्ये एक छोटी कृषी ट्रेडिंग फर्म म्हणून झाली. आज हा ग्रुप कोळसा व्यापार, खाणकाम, लॉजिस्टिक, वीज निर्मिती, वितरण आणि अलीकडेच ग्रीन एनर्जी, विमानतळ, डेटा सेंटर आणि सिमेंट क्षेत्रातही उतरले आहेत. चला तर मग गेल्या 10 वर्षात भागधारकांना जबरदस्त रिटर्न देणाऱ्या 6 अदानी ग्रुपच्या शेअर्सची लिस्ट पाहुयात…
अदानी ग्रीन एनर्जी : 2.94 लाख कोटी रुपये मार्केट कॅप असलेल्या Adani Group च्या या शेअर्समध्ये गेल्या एका वर्षात 60 टक्क्यांहून अधिकने वाढ झाली आहे. गेल्या 5 वर्षांत, अदानी ग्रीनच्या या शेअर्सची किंमत ₹26.45 वरून ₹1860 पर्यंत वाढली आहे. या कालावधीत सुमारे 6200 टक्के वाढ झाली आहे. हे लक्षात घ्या कि, जून 2018 मध्ये हा स्टॉक भारतीय स्टॉक एक्स्चेंजमध्ये लिस्टेड झाला होता.
अदानी एंटरप्रायझेस : Adani Group च्या या शेअरची मार्केट कॅप 2.41 लाख कोटी रुपये आहे. 2022 मध्ये, या शेअर्सची किंमत 25 टक्क्यांनी वाढली तर गेल्या एका वर्षात भागधारकांना 40 टक्के रिटर्न मिळाला. गेल्या 5 वर्षांत तर तो ₹132 वरून ₹2120 च्या पातळीवर गेला आहे. या कालावधीत त्यामध्ये सुमारे 1500 टक्के वाढ झाली. तसेच गेल्या 10 वर्षांमध्ये त्यामध्ये सुमारे ₹ 9.30 वरून ₹ 2120 प्रति शेअर इतकी वाढ झाली.
अदानी पोर्ट्स आणि सेझ : Adani Group च्या या शेअर्सचे मार्केट कॅप 1.44 लाख कोटी रुपये आहे. गेल्या 5 वर्षात तर त्याने 90% रिटर्न दिला आहे. तसेच गेल्या 10 वर्षांत याची किंमत सुमारे ₹115 वरून ₹680 पर्यंत वाढली. या कालावधीत यामध्ये सुमारे 500 टक्के वाढ झाली.
अदानी विल्मार : यावर्षी जानेवारी 2022 मध्ये अदानी विल्मर चा IPO ₹218 ते ₹230 प्रति इक्विटी शेअरच्या प्राइस बँडमध्ये लॉन्च करण्यात आला. याची किंमत आज सुमारे ₹ 570 प्रति शेअर आहे. त्याची मार्केट कॅप ₹ 73.78 हजार कोटी आहे.
अदानी पॉवर : अदानी पॉवरच्या शेअरची किंमत ₹ 101 वरून ₹ 260 पर्यंत वाढली आहे. 2022 मध्ये त्यात सुमारे 155 टक्क्यांनी वाढ झाली. गेल्या 5 वर्षांत तर त्याने 765 टक्के रिटर्न इतका दिला आहे. त्याचप्रमाणे, गेल्या 10 वर्षांत, ते सुमारे ₹ 45 वरून ₹ 260 पर्यंत वाढला आहे, या कालावधीत सुमारे 475 टक्के वाढ नोंदवली आहे. त्याची मार्केट कॅप सुमारे ₹ 99.43 हजार कोटी आहे. Adani Group
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.adanipower.com/
हे पण वाचा :
‘या’ Multibagger Stocks ने एका वर्षात गुंतवणूकदारांना मिळवून इतके पैसे !!!
लहान व्यावसायिकांसाठी OYO ची खास ऑफर, हॉटेल बुकिंगवर मिळणार 60% सूट !!!
Canara Bank ने सुरु केली स्पेशल FD, असा असेल व्याज दर !!!