हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयकर विभागाच्यावतीने आज सकाळी मुंबईत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेल्या राहुल कनाल यांच्या घरी छापा टाकण्यात आला. या छाप्यावरून आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “महाराष्ट्रात यापूर्वीपासूनच आयकर विभाग तसेच ईडीच्या धाडीचे सत्र सुरु आहे. हे तर दिल्लीचे आक्रमणच म्हणावे लागेल. या यंत्रणा भपच्या प्रचार यंत्रणा झाल्या आहेत,” अशी टीका ठाकरे यांनी केली.
आज सकाळीच आयकर विभागाच्यावतीने राहुल कणाल याच्या घरी छापा टाकल्यानंतर याबाबत मंत्री आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधत प्रतिक्रिया दिली. यावेळी मंत्री ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रात ज्या काही ईडी आणि आयकर विभागाकडून धाडी टाकल्या जात आहेत. ते केंद्राचे आक्रमणच म्हणावे लागेल. महापालिका निवडणुका जवळ आल्या असल्यामुळे अशाप्रकारे निवडणुकीच्या अगोदरच केंद्रीय तपास यंत्रणांकडून धाडी टाकल्या जात आहे. या तपास यंत्रणा भाजपच्या प्रचार यंत्रणाच झाल्या आहेत. मात्र, तरीही महाराष्ट्र झुकणार नाही आणि थांबणार नाही.
दरम्यान आज सकाळी आयकर विभागाने शिर्डी देवस्थानचे ट्स्टी आणि युवा सेनेचे पदाधिकारी राहुल कनाल यांच्या घरी छापा मारला. यावेळी आयकर विभागाचे एक पथक कनाल यांच्या वांद्रे येथील भाभा हॉस्पिटलच्या गल्लीतील नाईन अल्मेडा इमारतीतील कनाल यांच्या घरी आले. त्या ठिकाणी आयकर विभागाच्यावतीने पुरावे शोधण्याचे काम केले जात आहे.