देशात लोकशाही आहे की नाही यावर विचार करण्याची गरज; राऊतांवरील कारवाईवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडी ने दणका दिला आहे. राऊतांचे अलिबाग येथील प्लॉट आणि दादर येथील राहत्या घरावर ईडीने जप्ती आणल्यानंतर राजकारण तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना युवानेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना विचारले असता त्यांनी या संपूर्ण प्रकरणावरून केंद्रीय तपास यंत्रणावर निशाणा साधला आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, धमक्या देऊन कारवाई होऊ लागल्या आहेत हे अतिशय धोक्याचं आहे. त्यामुळे देशात आता लोकशाही आहे की नाही यावर विचार करण्याची गरज आहे. एखाद्या राजकीय नेता आधी कुणावर कारवाई होणार हे जाहीर करतो आणि दुसऱ्याच दिवशी यंत्रणांकडून कारवाई होते. सूड भावनेतून हे सर्व सुरू आहे. पण शिवसेना अशा कारवायांमुळे थांबणार नाही. आम्ही लढा देऊ, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

दरम्यान, ईडीच्या कारवाई नंतर संजय राऊत आक्रमक झाले आहेत. एक रुपया जरी भ्रष्टाचाराचा, चुकीचा पैसा माझ्या किंवा माझ्या पत्नीच्या खात्यावर आला असेल तर मी संपूर्ण संपत्ती भाजपच्या खात्यावर जमा करायला तयार आहोत. राहत्या घरावर कारवाई हा सूड आहे, घरातून बाहेर काढलं हा सूड आहे.. म्हणजे हा सूड मराठी माणसावर घेतला जात आहे, इतकं खालचं राजकारण कधी महाराष्ट्राने पाहिलं नव्हतं अस संजय राऊत म्हणाले.

Leave a Comment