मुंबई । आज संध्याकाळी ४ वाजता मुंबईतील वांद्रे परिसरात हजारो कामगारांनी एकत्र येत लोकडाउन विरोधात आवाज उठवला. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अशी गर्दी जमणे हे अतिशय धोकादायक आहे. यावर आता आदित्य ठाकरे यांनी भाष्य केले आहे. मोदी सरकारने लॉकडाउन वाढवताना कामगार वर्गाला घरी जाण्यासाठी २४ तासांकरता रेल्वे सेवा का सुरु केली नाही असा प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
The current situation at Bandra Station, now dispersed or even the rioting in Surat is a result of the Union Govt not being able to take a call on arranging a way back home for migrant labour. They don’t want food or shelter, they want to go back home
— Aaditya Thackeray (@AUThackeray) April 14, 2020
वांद्रा येथे आज घडलेली घटना हि गुजरातमधील सुरत येथील दंगली सारखीच आहे असंही ठाकरे यांनी म्हटले आहे. सुरत येथे देखील काही कामगारांनी एकत्र येत जाळपोळ केली होती. या कामगारांना खायला अन्न किंवा राहायला निवारा नकोय तर त्यांना आपल्या घरी परत जायचे आहे असे आदित्य यांनी सांगितले आहे. पंतप्रधान मोदी यांच्यासोबत झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग मिटिंग द्वारा राज्य सरकारने या कामगारांना आपापल्या गावी जात यावं याकरता २४ तासांकरता रेल्वे सेवा सुरु करण्याची विनंती केली होती असा खुलासाही आदित्य यांनी केला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”
हे पण वाचा –
भारताच्या वाटेवर असलेलं मेडिकल किटने भरलेले जहाज अमेरिकेला का पाठवले? WHO म्हणते…
३० एप्रिल ऐवजी मोदींनी ३ मे पर्यंत का वाढवला लॉकडाउन, हे आहे कारण
कहर कोरोनाचा! राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा २ हजार ४५५ वर