ठरलं तर!! भारत जोडो यात्रेत आदित्य ठाकरे होणार सहभागी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आज महाराष्ट्रात येणार आहे. या यात्रेत ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे सहभागी होणार आहेत. आमदार सचिन अहिर यांनी याबाबत माहिती दिली आहे. मात्र यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याची शक्यता कमी असल्याचं म्हंटल आहे.

सुरुवातीपासून ठाकरे घराणे भारत जोडो यात्रेत सहभागी होणार की याबाबत चर्चा सुरु होत्या. पण आता आदित्य ठाकरे या यात्रेसाठी उत्सुक असून हे राहुल गांधी यांच्यासोबत सहभागी होणार असल्याचे सचिन अहिर यांनी सांगितलं. त्यामुळे शिवसेनेचा काँग्रेसला स्पष्ट पाठिंबा मिळाला आहे. आदित्य ठाकरे सध्या मराठवाडा आणि विदर्भाच्या दौऱ्यावर असून तिथूनच ते थेट नांदेडमध्ये भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, कन्याकुमारी पासून सुरु झालेली राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा तेलंगणा येथून आज महाराष्ट्रात येणार आहे. संध्याकाळी साडेसात वाजता राहुल गांधी मशाल घेऊन नांदेडमध्ये येणार आहे. शेगावमध्ये 10 नोव्हेंबर रोजी राहुल गांधी गजानन महाराज यांचे दर्शन घेऊन सभा घेणार आहेत. भारत जोडो यात्रा तब्बल 14 दिवस महाराष्ट्रात असेल. यावेळी काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते उपस्थित राहतील.