पर्यावरणमंत्री असूनही तुम्ही काय केलं?, संतप्त पूरग्रस्तांचा आदित्य ठाकरेंना सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसामुळे नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच काही ठिकाणी दरड कोसळून जीवितहानी झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी चिपळूण येथील नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला. यावेळी संतप्त झालेल्या पुरग्रस्तांनी मात्र त्यांच्यावर संताप व्यक्त केला. एवढे मोठे निक्सन झाले आहे. आणि पर्यावरणमंत्री असूनही तुम्ही काय केलं?, असा सवाल यावेळी पुरग्रस्तांनी आदित्य ठाकरे यांना केला.

राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसामुळे महापूर आल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले. काही ठिकाणी दरड कोसळून पूरस्थिती निर्माण झाली. राज्यात 16 हजार कुटुंबाचं मोठं नुकसान झालं आहे. यात आता पुराचे पाणी ओसरल्यानंतर राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी चिपळूण भागातील दौऱ्यासाठी आज चिपळूणमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी पूरग्रस्तांशी आणि समस्या जाणून घेतल्या. मात्र, त्यांच्या या दौऱ्यावर पुरग्रस्तांकडून संताप व्यक्त करण्यात आला.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे जेव्हा चिपळूणमध्ये पुरग्रस्थांची भेट घेण्यासाठी गेले तेव्हा त्यांच्यावर पुरग्रस्तांनी प्रश्नांचा भडीमार केला. ठाकरेंवर पुरग्रस्तांनी संताप व्यक्त केला.

पुरग्रस्तांनी संताप व्यक्त केल्यानंतर मंत्री ठाकरे म्हणाले कि, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितल्याप्रमाणे हा पाहणी दौरा नसून मदतीसाठीचा दौरा आहे. आता मदतकार्याला सुरुवात झाली आहे. शासनाकडून मदत सुरु करण्यात आली आहे. आपण सगळे मिळून लोकांसाठी काम करत आहोत. पंचनामे पूर्ण झाल्यावर त्यांना सर्वोतोपरी मदत मिळेल.

Leave a Comment