औरंगाबाद : खाजगी रुग्णालयातील डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या उदासीनतेमुळे अजूनही पहिल्या टप्प्यातील लसीकरण पूर्ण झालेले नाही. त्यामुळे आता प्रशासन ज्या डॉक्टरांनी लस घेतलेली नाही, त्यांच्या रुग्णालय दवाखान्या पुढे या डॉक्टरांनी लस घेतलेली नाही, त्यामुळे येथे उपचार घेऊ नका अशा स्वरूपाच्या पाट्या लावणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली. कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी शासनाने लस उपलब्ध करून दिली आहे. मात्र खासगी रुग्णालयांमध्ये अनेक डॉक्टरांनी लस टोचून घेतली नाही असे असतानाही हे डॉक्टर रुग्णांना उपचार देत आहेत.
उपचार देणारे काही डॉक्टरही बाधित झाले आहेत. त्यामुळे लस न घेणाऱ्या डॉक्टरांविरोधात प्रशासनाने खडक मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.या लस न घेणाऱ्या डॉक्टरांची यादी प्रशासनाने तयार केली असून ‘या डॉक्टरांनी लस घेतलेली नाही त्यामुळे येथे उपचार घ्यावे की नाही हे रुग्णाने ठरवावे’ असे ठळक अक्षरात लिहिलेल्या पाट्या प्रशासन त्यांच्या रुग्णालय दवाखान्या पुढे लावणार आहेत.
पहिल्या टप्प्यातील लसीकरण 16 मार्च पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणावर भर देण्यात येणार आहे. या दरम्यान खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी लस टोचून घेणे आवश्यक असल्याचेही जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group