तरुणाचा कौतुकास्पद निर्णय! तृतीयपंथीयाशी करणार विवाह

0
128
beed
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – समाजात नेहमीच विशिष्ट प्रकारची, काहीशी नकारात्मक वागणूक मिळणाऱ्या तृतीय पंथीयांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे. यासाठी आपण काही करू शकतो का, असा विचार करत बीडमधील एक तरुण पुढे आला आहे. बीड शहरातील किन्नर सपना आणि बाळू नावाचा हा तरुण लवकरच विवाहबद्ध होणार आहे. मागील अडीच वर्षांपासून या दोघांची मैत्री असून आता या दोघांनी पुढील आयुष्यातही एकमेकांची साथ द्यायची असा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसात हे दोघेही विधिवत लग्न करणार असल्याची माहिती या दोघांनी दिली आहे.

बाळू धुताडमल हा जागरण गोंधळात हलगी वाजवून आपला उदरनिर्वाह करतो. अशातच त्याची ओळख सपनाशी झाली. या भेटीचे रूपांतर प्रेमात झालं आणि तब्बल अडीच वर्षानंतर त्यांनी आपला संसार फुलवण्याचा निर्णय घेतलाय. रुसव्या फुगव्यातून या दोघांच्या प्रेमाची गोडी अधिक घट्ट झालीय. समाजात आजही या घटकाला स्वीकारण्यासाठी नाकं मुरडली जातात. त्यामुळे लग्न करण्याचा पेच या जोडप्या समोर निर्माण झाला. त्यांनी पत्रकार संघाच्या आयशा शेख यांची भेट घेतली. आणि चर्चेतून मार्ग काढून अखेर विवाह जुळवण्याचा निर्णय बीडच्या पत्रकार संघाने घेतला आहे.

मराठवाड्यातला पहिलाच असा विवाह –
याआधी मनमाड मध्ये किन्नर शिवलक्ष्मी आणि संजय झाल्टे हे विवाह बंधनात अडकले होते. या विवाहानंतर मराठवाड्यातील हा पहिला विवाह होणार आहे. या घटकाला देखील समाजात मान सन्मानान देण्यात यावा. अशी भावना व्यक्त केली जातेय. त्यामुळे स्वतःहून जर असे विवाह इच्छुक असतील तर त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. येत्या मार्च महिन्यात 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन आहे. या दिनाचे औचित्य साधून बाळू आणि सपना हे दोघेही लग्न करणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here