पोलीस ठाण्यात वकीलास लाथा-बुक्यानी मारहाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाथरी पोलीस ठाण्यातील धक्कादायक प्रकार

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे

पोलीस ठाण्यात शुल्लक कारणावरुन कायदा रक्षकानेच कायदा हातात घेत चक्क वकीलास लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडलीय.

पाथरी तालुक्यातील लोणी येथिल एका प्रकरणाची फिर्याद देण्यासाठी एका पीडीतासोबत पाथरी न्यायालयामध्ये पेशाने वकिल असणारे अॅड.उत्तम डोंगरे पाथरी पोलीस ठाण्यात गेले असता त्यांनी ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना लोणी येथिल प्रकरणातील गुन्हा दाखल करण्यास उशीर का होत आहे ?अशी विचारणा करत असताना पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक काझी यांच्याशी शाब्दीक वाचाबाची झाली. थोडयाच वेळात याचे रुपांतर भांडणात झाले यावेळी अॅड उत्तम डोंगरे यांना लाथा-बुक्यानी मारहाण व जातीय वाचक शिविगाळ झाल्याचे नमुद करित सोमवार दि . 11 मे रोजी पाथरी पोलीसात उपनिरीक्षक काझी यांच्या विरूध्द लेखी स्वरूपात फिर्याद दिली आहे.

या प्रकरणामुळे पाथरी तालुक्यातील नागरीकात वेगवेगळी चर्चा ऐकयला मिळत आहे.चक्क वकीलाला पाथरी पोलीस मारत असतील तर सामान्य नागरीकांचे काय ? असा प्रश्न निर्माण झालाय . तक्रारीनंतर पोलीस प्रशासनाकडुन पोलीस निरिक्षक काझी यांच्यावर काय कार्यवाही होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .