अफगाणिस्तानच्या पॉप स्टारने भारताला म्हंटले खरा मित्र, पाकिस्तानवर केला असा आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

काबूल । अफगाणिस्तान आता तालिबानच्या ताब्यात गेला आहे. यानंतर, येथील सर्वात लोकप्रिय पॉप स्टार आर्यना सईदने आपला देश अफगाणिस्तान सोडला आहे. आर्यना सईदने काबूलहून फ्लाइट पकडून अमेरिकन फ्लाइटच्या मदतीने दुसऱ्या देशात गेली आहे. अफगाणिस्तान सोडल्यानंतर आर्यना सईदने ANI या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत भारताला खरा मित्र असल्याचे म्हटले आहे. त्याचवेळी पाकिस्तानवर मोठे आरोप केले.

आर्यना सईद म्हणाली,”आता मी माझा देश अफगाणिस्तानात नाही, मी बाहेर आहे, पण मी माझ्या देशाच्या आवाजहीन लोकांचा आवाज होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन, मी तिथल्या लोकांच्या समस्या जगासमोर आणण्याचा प्रयत्न करेन. सध्या माझ्या देशाला मदतीची गरज आहे.”

आर्यना सईद ANI शी बोलताना म्हणाली की,” पाकिस्तान हा एकमेव असा देश आहे जो सतत दहशतवाद्यांना प्रोत्साहन देत आहे, त्यांचे पालनपोषण करत आहे आणि त्या दहशतवाद्यांना इतर देशांना अस्थिर करण्यासाठी पाठवत आहे.” ती पुढे म्हणाली कि, “मी यासाठी पाकिस्तानला जबाबदार धरते, गेली अनेक वर्षे आपण व्हिडिओ पाहिले, पाकिस्तान सतत दहशतवादी संघटना तालिबानला बळ देत असल्याचे पुरावे पाहिले.”

ही अफगाण पॉप स्टार म्हणाली कि, “जेव्हा जेव्हा आमचे सरकार तालिबानी दहशतवाद्याला अटक करायचे. त्यानंतर तो कोण आहे, तो कोठून आला आहे हे शोधायचे, तेव्हा तो पाकिस्तानी निघायचा. म्हणूनच मी पाकिस्तानला दोष देईन. मला आशा आहे की,” आता पाकिस्तान अफगाणिस्तानच्या अंतर्गत व्यवहारात आणि हस्तक्षेप न करणाऱ्या राजकारणात हस्तक्षेप करणार नाही.”

Leave a Comment