पाटण | पाटण तालुक्यातील सणबूर येथील विकास सेवा सोसायटी निवडणुकीत माजी मंत्री विक्रमसिंहजी पाटणकर व सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या सणबूर सोसायटी बचाव पॅनेलने सत्ताधारी गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांच्या 35 वर्षांच्या सत्तेचा अक्षरशः धुव्वा उडवून 13 पैकी 11 जागा जिंकून सत्तांतर घडवले.
सणबूर विकास सेवा सोसायटी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत सणबूर सोसायटी बचाव पॅनेलने तब्बल 35 वर्षांनी सत्तांतर करून राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला. संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या या लढतीत सत्ताधारी देसाई गटाला अवघ्या 2 जागेवर समाधान मानावे लागले. पाटण तालुक्यातील विकास सेवा सोसायटीच्या निवडणुकींना जोरदार महत्व प्राप्त झाले आहे. कारण जिल्हा बॅंकेत शंभूराज देसाई यांनी अर्ज भरून थोडक्यात पराभवास सामोरे जावे लागले होते. अशातच सध्या गेल्या महिन्यात झालेल्या निवडणूकात 4 विकास सेवा सोसायटीत सत्तांतर करून गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या समर्थकांनी खेचून घेतल्या. त्यामुळे राष्ट्रवादीला जोरदार धक्का मानला जात होता. परंतु सणबूर सोसायटीत सत्तांतर केल्याने राष्ट्रवादीच्या गटाने कमबॅंक करण्यास सुरूवात केली आहे.
सर्व विजयी उमेदवारांचे विक्रमसिंह पाटणकर व सत्यजितसिंह पाटणकर यांनी अभिनंदन केले. सणबूर सोसायटी बचाव पॅनेलचे विजयी झालेले उमेदवार खालीलप्रमाणे उत्तम जाधव, चंद्रकांत जाधव, राजेंद्र जाधव, लक्ष्मण निकम, श्रीरंग जाधव, कृष्णत साळुंखे, सुरेश साळुंखे, मायादेवी जाधव, सुवर्णा साळुंखे, आनंदा मगरे व भगवंतराव खेडेकर (बिनविरोध). निवडणूक निकालानंतर विजयी उमेदवारांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष केला.