हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2019 मध्ये आलेल्या कोरोना या भयानक व्हायरस नंतर आता डेंग्यू आणि चिकनगुनिया या रोगांचे संकट संपूर्ण जगावर आहे. WHO म्हणजेच – वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन चे गव्हर्नर जनरल डॉ. टेड्रोस आधानोम घेब्रेयसस यांनी याबद्दल संपूर्ण जगाला सतर्क केलं आहे. अतिउष्ण हवामानामुळे डेंग्यू आणि चिकनगुनियासारख्या आजारांचा धोका वाढू शकतो असं त्यांनी म्हंटल आहे. त्यामुळे येत्या काही काळात सावधगिरी बाळगणे गरजेचं आहे.
स्विझर्लंड येथील 73 व्या जागतिक आरोग्य संघटनेच्या बैठकीत WHO चा अहवाल सादर करत असताना गव्हर्नर जनरल डॉ. टेड्रोस आधानोम घेब्रेयसस यांनी या नव्या व्हायरस बद्दल माहिती दिली. ते म्हणाले की, उष्णकटिबंधीय पॅसिफिक प्रदेशात समुद्राचे तापमान वाढल्याने वातावरणात बदल होत आहे. या अल निनो मध्ये वाढणाऱ्या अति उष्णतेमुळे डेंग्यू आणि चिकनगुनिया सारख्या आजाराचा धोका वाढू शकतो. डासामुळे हा विषाणू वेगाने पसरू शकतो.
दक्षिण अमेरिकेतील देशांमध्ये हा रोग अगोदरच पसरलेला असून आशिया खंडात देखील या रोगाचा धोका वाढू शकतो. कंबोडिया आणि मलेशिया,थायलंडमध्ये या रोगाचे रुग्ण वाढलेले आहेत. थायलंडमध्ये डेंगू चे 19 हजार 503 रुग्ण सापडले. त्याचबरोबर पेरू यासारख्या देशांनी अगोदरच राज्य आणीबाणी जाहीर केलेली आहे. यादेशात डेंगू चे विक्रमी दीड लाख रुग्ण आढळून आलेले आहे. यामुळे देशाची आरोग्य व्यवस्था विस्कळीत होऊ शकते, त्याची चिंता सतावते आहे.