जावयाने दिलेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे सासूची गळफास घेऊन आत्महत्या

Sucide
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीड : हॅलो महाराष्ट्र – आठवडाभरापूर्वी सुशीला विश्वनाथअप्पा बेंबळगे या महिलेने महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांनी हि आत्महत्या का केली याचे कारण समोर आले आहे. सुशीला यांनी डॉक्टर जावई आणि त्याच्या कुटुंबियांनी दिलेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे आत्महत्या केली आहे. याप्रकरणी मुलगी नमिता अमोल रकटे यांनी शनिवारी परळी पोलीस ठाण्यात डॉक्टर जावयासह चौघांविरुद्ध तक्रार दाखल करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. नमिता अमोल रकटे यांनी पती डॉक्टर अमोल शरणआप्पा रकटे, सासू जयश्री शरणआप्पा रकटे, सासरा शरणआप्पा विश्वनाथआप्पा रकटे, नणंद श्रूती शरणआप्पा रकटे यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी नमिता यांचा विवाह डॉक्टर अमोल रकटे यांच्याशी झाला होता. लग्नाच्या काही दिवसांनंतर सासरच्या मंडळींनी नमिता आणि तिच्या कुटूंबियांना अपमानास्पद वागणूक देण्यास सुरुवात केली. लग्नात चुकीची माहिती देऊन दिशाभूल केली म्हणून नमिताची आई सुशीला यांचा सतत अपमान करण्यात येत होता. तसेच त्यांच्यावर लग्नात दिलेलं स्त्रीधन तळतळाट लावून दिल असून आमच्या घरावर दैवी कोप झाला आहे. असा आरोप करण्यात आला.

याबरोबर दोन लाख रुपये आणि एक सोन्याची अंगठी देण्याची मागणी सासरच्या मंडळींकडून करण्यात आली होती. तसेच सुशीला, त्यांचे पती आणि मुलाला डॉ अमोल यांच्या पाया पडण्यास भाग पडल्याचे देखील नमिता यांनी आपल्या तक्रारीत म्हंटले आहे. तसेच नमिताला चारित्र्याच्या संशयावरून सासरच्या मंडळींकडून त्रास देण्यात येत होता. मुलीला होणार त्रास आणि जावयाने केलेला अपमान सासू सुशीला यांना सहन न झाल्याने त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.