महाराष्ट्र हादरला ! महिलेनं वडिलांच्या साथीने स्वत:च पुसलं कुंकू

0
101
murder
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीड : हॅलो महाराष्ट्र – अडीच महिन्यांपूर्वी बीड जिल्ह्याच्या माजलगाव येथील धरणात एका तरुणाचा मृतदेह आढळला होता. या तरुणाने आत्महत्या केली की त्याच्यासोबत घातपात झाला. याबाबत कोणताही पुरावा पोलिसांच्या हाती लागला नव्हता. यामुळे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. या प्रकरणाचा तपास सुरु असताना मृत तरुणाच्या भावानं धक्कादायक खुलासा केला आहे. मृत भावाच्या पत्नीने आणि सासऱ्यानेच आपल्या भावाचा खून केल्याची तक्रार दाखल केली.

काय आहे प्रकरण ?
27 सप्टेंबर 2021 रोजी माजलगाव धरणात एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळला होता. पोलिसांनी या घटनेचा तपास केला असता, संबंधित मृतदेह तालखेड येथील रहिवासी असणाऱ्या दत्तात्रय रामकिसन घायाळ यांचा असल्याचं समोर आले होते. पण दत्तात्रय यांचा मृत्यू नेमका कसा झाला याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले नव्हते. यानंतर माजलगाव शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत असताना मृत दत्तात्रय घायाळ यांचा भाऊ पवन घायाळ यानं 12 डिसेंबर रोजी पोलिसांत एक तक्रार दाखल केली आहे. मृत दत्तात्रय यांच्या पत्नीने आणि सासऱ्यानेच त्याची हत्या केल्याची तक्रार भावाने केली आहे.

जमीन नावावर का करून देत नाही, या कारणातून सासरे जनार्दन म्हस्के आणि पत्नी गीता घायाळ यांनीच दत्तात्रय यांच्या डोक्यावर आणि कपाळावर बोथट हत्याराने वार केल्याचे भावाने पोलिसांना सांगितलं आहे. तसेच खून केल्यानंतर आरोपी बापलेकीनेच दत्तात्रय यांचा मृतदेह माजलगाव येथील धरणात टाकून दिल्याचे पवन घायाळ यांनी आपल्या तक्रारीत म्हंटले. या प्रकरणी माजलगाव शहर पोलिसांनी मृताच्या पत्नी आणि सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे तसेच पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here