कचोरीसोबत कांदा न दिल्यानं तरुणीचा राडा; धिंगाण्याचा Viral Video पहाच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये आंबट, गोड, तिखट अशी चमचमीत चव असणाऱ्या कचोरीवरुन एका तरुणीने राडा घातला आहे. कचोरीसोबत कांदा न दिल्याने या तरुणीनं जोरदार धिंगाणा घातला आहे. हि तरुणी एवढ्यावरच थांबली नाहीतर तिने कचोरी विकणाऱ्याला मारहाणसुद्धा केली आहे.

व्हायरल होणारा व्हिडीओ हा गार्डनमधील आहे. तरुणी खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्याकडे कचोरीची मागणी करते. तेव्हा तिला तो कचोरी देतो पण सोबत कांदा देत नाही. प्लेटमध्ये कांदा नाही म्हटल्यावर तरुणी विक्रीदाराला कांदा देण्यास सांगते मात्र, तो कांदा संपला आहे असे सांगतो. ते ऐकताच तरुणी भडकते आणि त्या व्यक्तीबरोबर वाद घालण्यास सुरुवात करते.

कचोरी विकणारा व्यक्ती तरुणीला समजावत पैसे देण्यास सांगतो तेव्हा तरुणीचा संयम सुटतो आणि ती त्या दुकानदाराच्या सायकलला लाथ मारते. त्यामुळे सायकलवरील दुकानदाराचे सर्व सामान जमिनीवर पडून खराब झाले. दुकानदार त्याच्या नुकसानीची भरपाई देण्याबाबत बोलतो तर ती तरुणी त्याला मारहाण करते. तसेच या घटनेचा व्हिडिओ बनवणाऱ्यावर देखील हि तरुणी भडकते.

Leave a Comment