उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर 24 तासांत राज्यपालांनी ‘तो’ आदेश घेतला मागे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्य राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ माजली आहे. अखेर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल रात्री मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे या वादावर आता पडदा पडला आहे. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देताच राज्यपालांनी बोलावलेले विशेष अधिवेशन रद्द करण्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळणार अशी वर्तवली जात होती. यानंतर न्यायालयायीन लढाईच्यानंतर महाविकास आघाडी सरकारने अखेरचा जय महाराष्ट्र केला.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज विशेष अधिवेशन बोलावले होते. मात्र आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल रात्री राजीनामा दिल्यानंतर राज्यपालांनी विशेष अधिवेशनाचा निर्णय मागे घेतला. विधानभवनाकडून विशेष अधिवेशन रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजीनामा दिल्यानंतर विशेष अधिवेशन होणार नाही, हे स्पष्ट झाले होते. त्यानंतर रात्रीच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यपालांना भेटून आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी (Uddhav Thackeray) राजीनामा दिला असला तरी उद्धव ठाकरे हे सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री असणार आहे, तशी विनंती करण्यात आली आहे.

यानंतर आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आता सगळ्यात मोठा पक्ष असलेल्या भाजपला तुमच्याकडे बहुमत आहे का, हे विचारेल. भाजपकडे बहुमत असेल तर ते त्याचं पत्र राज्यपालांना देतील, यानंतर राज्यपाल भाजपला सत्तास्थापनेसाठी बोलावतील. शपथविधीमध्ये सुरूवातीला मुख्यमंत्री आणि ठराविक महत्त्वाच्या मंत्र्यांचा शपथविधी होईल. शपथविधी झाल्यानंतर भाजपला विधानसभेमध्ये बहुमत सिद्ध करावं लागेल. बहुमत सिद्ध झाल्यानंतर उरलेल्या मंत्रीमंडळाचा शपथविधी होईल. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नव सरकारचा 1 जुलैला शपथविधी होण्याची शक्यता आहे. तसेच उद्या विधानसभेच्या हंगामी अध्यक्षांची निवडदेखील करण्यात येणार आहे.

हे पण वाचा :
शिवसैनिक आक्रमक!! श्रीकांत शिंदे यांचे कार्यालय फोडले

आम्ही शिवसेनेचेच सदस्य, काँग्रेस- राष्ट्रवादीनेच सेनेला हायजॅक केलं

हिंमत असेल तर स्वतःच्या बापाच्या नावाने मतं मागा; मुख्यमंत्र्यांचा शिंदेवर हल्लाबोल

साताऱ्यात आ. शंभूराज देसाई यांच्या विरोधात आंदोलन

मुंबईत 10 जुलै पर्यंत जमावबंदी लागू

Leave a Comment