चांद्रयानच्या यशानंतर आता World Cup ची बारी? रोहितचा फोटो शेअर करत मुंबई इंडिअन्सचं सूचक ट्विट

Rohit sharma
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बुधवारी संपूर्ण भारतवासीयांना अभिमान वाटेल अशी बाब घडली आहे. अखेर काल चांद्रयान-3 यशस्वीरित्या चंद्रावर लँडिंग झाल आहे. त्यामुळे भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सेफ लँडिंग करणारा पहिलाच देश ठरला आहे. कालपासून या यशाचा संपूर्ण भारतात आनंद साजरी करण्यात येत आहे. फटाके फोडून, शुभेच्छा देऊन, ट्विट करून लोक इस्त्रोवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. मात्र या सगळ्यात मुंबई इंडियन्सने केलेले ट्विट जास्तच चर्चेत आले आहे. हे ट्विट पाहून भारत यंदाचा क्रिकेट वर्ल्ड कप जिंकणारच असा संदेश मिळत आहे

काय आहे मुंबई इंडिअन्सचं ट्विट?

गेल्या अनेक दिवसांपासून चांद्रयान 3 मोहीमेकडे संपूर्ण भारताचे लक्ष लागून राहिले होते. 2019 मध्ये इस्त्रोकडून चांद्रयान 2 मोहीम यशस्वी झाली नव्हती. विक्रम लँडरचे क्रॅश लँडिंग झाल्यामुळे भारताच्या हाती अपयश आले. मात्र यावर्षी इस्त्रोने चंद्रयान 3 मोहीम यशस्वीरित्या पूर्ण करून दाखवले आहे. त्यामुळे संपूर्ण भारतवासीयांसाठी कालचा दिवस अत्यंत अभिमानास्पद ठरला आहे. विशेष म्हणजे, या यशानंतर भारतवासी सोशल मीडियाच्या माध्यमातून इस्त्रोवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहे.

 

 

असेच एक इस्त्रोच्या कामगिरीबद्दल शुभेच्छा देणारे ट्विट मुंबई इंडियन्सने केले आहे. या ट्विटमध्ये 2019 मधले इस्त्रोचे अपयश आणि 2023 मधले यश असे दोन्ही काळ दाखविले आहेत. ज्यात एका फोटोत इस्रोचे प्रमुख के सिवन एका ठिकाणी अपयश हाती आल्यामुळे निराश, तर दुसऱ्या फोटोत चंद्रयान 3 मोहीम यशस्वी झाल्यामुळे एस सोमनाथ आनंदी दिसत आहेत. यालाच तुलना करत रोहित शर्माचा  2019 मधला निराश झालेला फोटो दाखविला आहे. तर 2023 मधला फोटो लोडींग दाखविला आहे.

हे ट्विट पाहून भारत यंदाचा क्रिकेट वर्ल्ड कप जिंकणारच असा संदेश मिळत आहे. तसेच 2019 मधील अपयशानंतर आता 2023 मध्ये भारतीय क्रिकेट संघालाही चांद्रयानप्रमाणे यश मिळणार का अशा चर्चा सुरु आहेत. अनेकांनी या ट्विटवर वेगवेगळया कमेंट्स केल्या आहेत. तसेच काहींनी, आता आपल्या वर्ल्ड कप विजयाची बारी असे देखील म्हणले आहे. 2019 मध्ये भारतीय क्रिकेट संघाला वनडे वर्ल्डकपमध्ये अपयश आले होते. त्यामुळे संपूर्ण संघ निराश झाला होता. मात्र आता नव्या उर्जेसहित भारत बाजी मारण्यासाठी सज्ज झाला आहे.