विकेंड लॉकडाऊननंतर आज राज्यभर झालेली गर्दी घातक ठरणार : विजय वडेट्टीवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यातील कोरोनाचा कहर वाढलेला आहे. तज्ज्ञांच्या मते मे अखेरीपर्यंत राज्यात विस्फोटक परिस्थिती राहील. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडायची असेल तर 14 दिवसांच्या लॉकडाऊनशिवाय पर्याय नाहीच. असं सांगतानाच माणसं मरत असताना उत्सव कशाला करताय, असा सवाल उपस्थित करीत राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विकेंड लॉकडाऊननंतर आज राज्यभर झालेली गर्दी घातक ठरणार आहे, असं विधान केलं.

राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, भविष्यात भयावह अशी स्थिती राज्यात होणार आहे. अशी परिस्थिती पुन्हा येऊ म्हणून १० दिवसांपीसून मी कडक लॉकडाऊनची मागणी करतोय. राज्यात सध्या लॅाकडाऊन शिवाय पर्याय नाही. एक आठवडा किंवा १४ दिवस लॉकडाऊन? याबाबत कॅबीनेट बैठकीत चर्चा होणार आहे. तसेच मुंबई लोकल बंद करायची की निर्बंध लावायचे?, यावर कॅबीनेट बैठकीत निर्णय घेतला जाईल. कोरोनाच्या वाढत्या प्रसाराला थांबविण्यासाठी मुंबई लोकलची गर्दी थांबावी लागेल. मे शेवटीपर्यंत ही विस्फोटक परिस्थिती राहील. राज्यात लस संपलीय, अनेक ठिकाणी लसीकरण ठप्प झालंय. गुढीपाडवा आणि १५ एप्रिलनंतर लॅाकडाऊन बाबत निर्णय घेतला जाईल.

लॉकडाऊनमध्ये गरीबांना मदतीसाठी अर्थमंत्री नियोजन करतायत. अशा परिस्थितीत माणसं मरत आहेत, मात्र पंतप्रधानमंत्री मोदींनी लसीकरण उत्सव साजरा करण्याचे सांगितले आहे. लसीचा नसतील तर लसीकरण उत्सव कसला? साजरा करायचा. कुणी उपकाराची भाषा करत असेल, तर तो पदाशी बेईमानी करतोय. कोरोनावर विजय मिळवल्यानंतर उत्सव करता येईल. विरोधकांनी राजकारण करु नये.

वीकेंड लॉकडाऊन लावल्यानंतरही आज राज्यभर गर्दी होत आहे. ही गर्दी अतिशय घातक आहे. त्यामुळे नागरिकांची गर्दी रोखायची असेल तर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही. भविष्यात ही परिस्थिती अधिक भयावह होणार आहे. या कोरोनातून वाचायचं असेल तर अजिबात घराबाहेर पडू नका. लॉकडाऊन होईल तेव्हा होईल. परंतु, तुम्ही घराबाहेर पडू नका. जर परिस्थिती अशीच राहिली तर महाराष्ट्रात मृतदेहांचा खच पडेल, अशी भीती वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.

You might also like