सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
कुपवाड शहरातील मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्या उद्घाटन कामाच्या श्रेय वादावरून राष्ट्रवादी भाजप नगरसेवक यांच्यात सुमारे दोन तास चांगलीच खडाजंगी झाली. या रस्त्याच्या उद्घाटनाचे भाजपने चार वाजता आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते करण्याचे ठरवले .तर त्या आधीच राष्ट्रवादीचे नगरसेवक विष्णु माने ,शेठजी मोहिते,पदाधिकर्यांच्या समवेत विरोधीपक्ष नेते संजय मेंढे यांच्या हस्ते नारळ फोडण्यासाठी मुख्य रस्त्यावर आले.
त्याचवेळी भाजपचे नगरसेवक प्रकाश ढंग, कल्पना कोळेकर भाजपच्या पदाधिकारी यांनी कामाचे श्रेय कोणीही घ्यायचे नाही अन्यथा नारळ फोडू देणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतली. कुपवाडमध्ये मुख्य रस्ता होण्यासाठी नगरसेवकांसह, अनेक संघटनांनी प्रयत्न केले होते. भारतीय जनता पार्टीने महापालिकेत निर्विवाद सत्ता मिळाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी शंभर कोटींचा निधी दिला होता. त्यामधून कुपवाड मुख्य रस्त्याचे काम धरले होते. अडीच वर्षानंतर राष्ट्रवादीने सत्ता घेतल्यानंतर कामाचा प्रारंभ करण्यासाठी राष्ट्रवादीचे नगरसेवक शेडजी मोहिते, सविता मोहिते, विष्णू माने, मुस्ताक रंगरेज व राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी भाजपचे नगरसेवक प्रकाश ढंग, कल्पना कोळेकर,भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जागेवर जाऊन सदर रस्ता हा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी दिलेल्या फंडातून होत आहे त्यामुळे या कामाचे उद्घाटन सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते होईल असे म्हणताच भाजप व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये चांगलीच शाब्दिक खडाजंगी पाहायला मिळाली.