सरकारच्या ‘त्या’ निर्णयाच्या विरोधात शेतकरी संघटना करणार आंदोलन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे , 
शेतकर्‍यांसाठी आवश्यक असलेले तणनाशक ग्लायफोसेटवर बंदी घालण्याचे कारस्थान राज्य सरकारकडून सुरू आहे. या ग्लायफॉसेटमुळे कॅन्सर होत असल्याचा गैरसमज करून घेऊन कृषी सचिव आणि कृषी आयुक्त यांनी सर्व कृषी विद्यापीठाकडून या संदर्भात माहित मागवली आहे.
कृषी विद्यापीठाकडून बंदीसाठी हवी तशी सोईस्कर माहिती घेऊन ग्लायफॉसेटवर बंदी घालण्याचे कारस्थान असल्याचे स्पष्ट झाले आहे. याविरोधात शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटना आक्रमक होऊन विरोध करणार असल्याची माहिती सहकार आघाडी प्रमुख संजय कोले यांनी सांगितले.
सहकार आघाडीचे प्रमुख कोले पुढे म्हणाले, सरकारकडून गेल्या वर्षीही अनाधिकृत जीए कापूस बियाणांचा वापर रोखण्यासाठी, ग्लायफॉसेटवर बंदी घालण्याचा विचार केला होता. तथापि त्याला शेतकरी संघटना यांनी विरोध केल्याने बंदी घालण्याचा प्रकार बारगळला होता. याबाबत संघटनेच्यावतीने कृषी अधिक्षक राजेंद्र साबळे यांनाही निवेदन दिले. अमेरिकेत ग्लॉसफॉसेटमुळे केसर होते असा समज करून, कनिष्ट कोटाने कॅन्सर पीडितांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय झाला होता. वैज्ञानिक संशोधनाकडे दुर्लक्ष करून घेतलेला हा निर्णय चुकीचा असल्याने, जगात कोणत्याच देशात जायफॉसेटवर बंदी घातली नाही, परंतु महाराष्ट्रात मात्र बंदी घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ग्लायफॉसेटमुळे कॅन्सर होत नाही, असे सिद्ध करणारे असंख्य पुरावे आणि शोध निबंध उपलब्ध आहेत. या विषयावरील सर्व मान्यताप्राप्त नियंत्रक संस्थांनी हे नाकारले आहे. यामुळे एकाही प्रगत, समृद्ध देशात बंदी नाही. तरीही काही हितसंबंधी लोकांच्या दबाव आणि आमिषामुळेच ग्लायफॉसेटवर बंदीचा घाई कृषी खाते करीत आहे. याला शेतकरी संघटनेचा विरोध करणार असल्याचे कोले यांनी सांगितले.

Leave a Comment