नेलेत खोडवा ऊसासह कडब्याची गंज जळाली: अज्ञाता विरोधात गुन्हा

सातारा | नेले (ता.सातारा) येथे दोन एकर खोडवा ऊसासह ज्वारीच्या कडब्याची गंज जाळण्यात आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. यामुळे संबंधित शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याबाबत अज्ञाताविरोधात तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या दुर्घटनेत तीन शेतकऱ्यांचे सुमारे 2 ते अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नेले गावच्या उत्तरेकडे असलेल्या … Read more

मार्केट कमिटीच्या निवडणुकीचा बिगूल एप्रिलनंतर वाजणार : बाळासाहेब पाटील

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सध्या विकास सेवा सोसायटीच्या निवडणुका सुरू असून काही सोसायटीच्या निवडणुका बाकी आहेत. विकास सेवा सोसायटीची निवडणूक प्रक्रिया संपताच कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा बिगुल एप्रिल महिन्यानंतर शेवटच्या आठवड्यात वाजणार असल्याचे सूतोवाच सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले आहेत. https://fb.watch/bRBJWRE48Q/ कराड येथे सहकारमंत्री श्री. पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत … Read more

किसनवीर कारखाना वाचविण्यासाठी शिवसेना पॅनेल टाकणार : योगेश बाबर

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके किसनवीर सहकारी साखर कारखान्याचा एकूण तोटा 175 कोटीच्या घरात आहे . या कारखान्याने प्रतापगड व खंडाळा हे युनिट चालवायला घेतल्यानेच किसनवीरच्या आर्थिक अडचणी वाढून वाई तालुक्याची सहकार चळवळ धोक्यात आली आहे. पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र असणारा हा कारखाना वाचविणे ही येथील शेतकऱ्यांची गरज आहे. त्यामुळे आगामी निवडणूकीत आम्ही पॅनेल टाकू अशी … Read more

सातारा- मेढा रस्त्यावर होळी सणासाठी जाताना युवकाचा अपघातात मृत्यू

सातारा | सातारा- मेढा रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला मागून दुचाकीने जोरदार धडक दिल्याने युवक जागीच ठार झाला. गुरूवारी रात्री गावाकडे होळी सणासाठी गावाकडे जात असताना केंजळ गावच्या हद्दीत हा अपघात झाला. शैलेश बाळाराम गोगावले (वय- 23, रा. गोगावलेवाडी) असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, गोगावलेवाडी (ता. सातारा) येथील शैलेश गोगावले हा … Read more

अवैध लाकूड वाहतूक : महामार्गावर तीन ट्रकसह 14 लाखांचा मुद्देमाल जप्त

कराड | पुणे- बंगळूर महामार्गावर उंब्रज गावच्या हद्दीत अवैध लाकूड वाहतूक प्रकरणी तीन वाहनांवर वनविभागाने कारवाई केली. या कारवाईत 14 लाखाचा मुद्देमालही जप्त करण्यात आला. वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, रात्रीची गस्त घालत असताना उंब्रज- कराड व उंब्रज – पाटण या दरम्यान तीन कारवाई करण्यात आल्या. वनक्षेत्रपाल तुषार नवले, वनरक्षक बी.जी. खटावकर, वनरक्षक यु. एम. पांढरे यांनी … Read more

शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला : मस्करवाडीत वैरण काढताना बिबट्या व बछडा शेतात

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील उंब्रज भागात असलेल्या मस्करवाडी येथे शेतात वैरण आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला. त्यांना उपचारासाठी कराड येथे काॅटेज हाॅस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शेतात कडबा कापताना मादीने हल्ला केला आहे, बिबट्या मादीसोबत एक बिबट्याचे पिल्लू (बछडा) असल्याने हल्ला झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती … Read more

परराज्यातून येणा-या दूधाळ जनावरांच्या वाहतूकीसाठी अनुदान द्या : खा. श्रीनिवास पाटील

Shrinivas Patil

सातारा | परराज्यातून महाराष्ट्रात उत्तम प्रतीची दुधाळ जनावरे आणताना त्यांच्या वाहतूकीवर होणाऱ्या खर्चामुळे शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यामुळे अशा जनावरांच्या वाहतूकीसाठी अनुदान देण्यात यावे, अशी मागणी खा.श्रीनिवास पाटील यांनी लोकसभेत केली. लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान याविषयी प्रश्न उपस्थित करताना खा. श्रीनिवास पाटील म्हणाले, दुधाळ जनावरे ही हरियाणा, पंजाब राज्यात उपलब्ध होतात. तेथून महाराष्ट्र राज्य दूर आहे. जर … Read more

राज्यात संपूर्ण ऊस गाळपाशिवाय कारखाने बंद करू नये : बाळासाहेब पाटील

Balasheb Patil Karad

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्यात सध्या ऊस आज मोठ्या प्रमाणावर शेतात उभा आहे. ऊसाचे उत्पन्न वाढल्याने गाळपाचे मोठे आव्हान आहे. कारण गेल्या दोन वर्षात चांगला झालेला पाऊस तसेच दुष्काळी भागात पाणी पोहचल्याने तरूण शेतकऱ्यांनी ऊसाचे चांगले उत्पादन काढले आहे. तरीही साखर आयुक्ताच्या मार्फत मी आढावा घेत आहे. त्यामुळे सर्व कारखान्यांना संपूर्ण ऊस गाळप झाल्याशिवाय … Read more

शेतकरी बांधवांच्या हिताचा अर्थसंकल्प, सहकार क्षेत्रासाठी 1 हजार 512 कोटी : बाळासाहेब पाटील

Balasheb Patil

कराड | महाविकास आघाडी सरकारचा हा तिसरा अर्थसंकल्प असून सहकार व पणन विभागासाठी 1 हजार 512 कोटी रुपयांची भरीव अशी तरतूद करून शेतकरी बांधवांच्या हिताचा आणि सहकार व पणन क्षेत्र अधिक सक्षम करणारा राज्याचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत मांडला. अशी प्रतिक्रिया सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी अर्थसंकल्पावर देऊन मुख्यमंत्री उध्दव … Read more

Video : रयत कारखान्याचा ऊसाने भरलेला ट्रक कालव्यात कोसळला

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके पसरणी (ता. वाई) येथील भैरवनाथनगर येथे ऊसाची वाहतूक करणारा ट्रक पाण्याने भरलेल्या कालव्यात कोसळला. ही घटना सायंकाळी 6 च्या सुमारास ही घडली. ट्रकचालकाने वेळीच ट्रकमधून उडी घेतली. त्यामुळे जिवितहानी टळली, मात्र ट्रक कालव्यात कोसळल्याने पाणी तुंबून लाखो लिटर पाणी कालव्यातून बाहेर जावून वाया गेले. धोम पाटबंधारे विभागाने तातडीने कालव्यातील पाणीपुरवठा … Read more