वाई तालुक्यात विद्युत पुरवठा करणाऱ्या डी. पी. फोडून तांब्याच्या तारा लंपास, शेतकरी चिंताग्रस्त

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके कवठे (ता. वाई) येथील शेतीच्या पाणीपुरवठा करणारी डी. पी. फोडून त्यातील तांब्याच्या तारा पळविण्याचे सत्र सुरूच आहे. आतापर्यंत चोरट्यांनी 20 हून अधिका डी. पी फोडलेल्या आहेत. पोलिसांनी तातडीने या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. वारंवारं होणाऱ्या चोऱ्यामुळे परिसरातील शेतक-यांच्यात चिंतेचे वातावरण आहे. याबाबत अधिक माहिती अशी, कवठे … Read more

साताऱ्यात “ग्लोबल वॉर्मिंग – ग्लोबल वॉर्निंग” या विषयावर परिसंवाद ः नितीन पाटील

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके ग्लोबल वॉर्मिंगमुळे होणारे हवामानातील बदल, त्याचे दुष्परिणाम आणि त्यामुळे वेळोवेळी येणाऱ्या आपत्ती याबाबत जिल्ह्यातील शेतकरी सभासदांना जाणीव व्हावी, यावरील उपाययोजना जाणून घेवून आपले शेती उत्पादन वाढवावे या उद्दात हेतूने “ग्लोबल वॉर्मिंग – ग्लोबल वॉर्निंग” जागतिक तापमान वाढीचे दुष्परिणाम व उपाययोजना या विषयावर सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., सातारा व दि … Read more

जर तुम्ही अशाप्रकारे पीएम किसान योजनेचा लाभ घेत असाल तर होईल कडक कारवाई

PM Kisan

नवी दिल्ली । जर तुम्हीही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. असे अनेक शेतकरी आहेत जे पीएम किसान योजनेत सामील झाले आहेत, मात्र ते या योजनेच्या अटी व नियम पूर्ण करत नाहीत आणि तरीही या योजनेचा लाभ घेत आहेत. अशा अपात्र शेतकऱ्यांवर आता कडक कारवाई करण्याचे आदेश … Read more

सातारा जिल्ह्यात 1340 हेक्टरवर सोयाबीन लागवड

सातारा | गतवर्षी सोयाबीनच्या दरात झालेली समाधानकारक वाढ, खरिपात बियाण्यांसह होणारी मागणी यामुळे जिह्यातील शेतकऱ्यांचा उन्हाळी सोयाबीन लागवडीकडे कल वाढला आहे. जिह्यात आतापर्यंत 1340 हेक्टरवर सोयाबीन लागवड झाली असून, सातारा तालुक्यात सर्वाधिक लागवड झाल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. सातारा जिह्यात सोयाबीनची खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. सोयाबीनचे सरासरी 65 हजार हेक्टर … Read more

भोसले गटाची सत्ता : वाठार सोसायटीत सत्तांतर तर बेलवडे बुद्रुक विजयी परंपरा कायम

कराड | कराड दक्षिणमधील वाठार व बेलवडे बुद्रुक येथील विकास सेवा सोसायटीच्या निवडणुकीत डाॅ. अतुल भोसले गटाने बाजी मारली आहे. पंचक्रोशीतील नागरिकांचे लक्ष लागून राहिलेल्या वाठार विकास सेवा सोसायटीत राजेश पाटील – वाठारकर समर्थक गटाचा डॉ. अतुल बाबा भोसले गटाने 10-3 असा धुव्वा उडवत सत्तांतर घडवून आणले. तर बेलवडे बुद्रुकमध्ये भोसले गटाने विजयी परंपरा कायम … Read more

पुणे- मिरज रेल्वे दुहेरीकरण भूसंपादनासाठी सातबारानुसार जमिनीची मोजणी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पुणे- मिरज रेल्वे दुहेरीकरण भूसंपादनासाठी आज कोपर्डे हवेली येथील शेतकऱ्यांची यादववाडी हद्दीतील एकूण 10 गट नंबरची जमिनीची सयुंक्त मोजणी सातबारानुसार करण्यात आली. रेल्वेच्या हद्दीचे कोणतीही कागदपत्रे पुरावे नसल्याने शेतकऱ्यांच्या भूमिअभिलेखाकडील गटांच्या रेकॉर्डनुसार मोजणी करण्यात आली. कोपर्डे हवेली येथील अजून जवळपास 90 शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होणार आहेत. बाधित होणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचा … Read more

खरीप हंगामात भासणार नाही खताची कमतरता; शेतकऱ्यांसाठी सरकारने उचलले मोठे पाऊल

नवी दिल्ली । रब्बी हंगामात शेतकऱ्यांना खतासाठी खूप हेलपाटे मारावे लागत असून देशातील अनेक राज्यांमध्ये आजही युरियासाठी शेतकऱ्यांची भटकंती सुरूच आहे. यातून धडा घेत केंद्र सरकारने खरीप हंगामासाठी युरिया आणि DAP खतांची व्यवस्था करण्यास सुरुवात केली आहे. खरीप हंगामात खताचा तुटवडा नसल्याचे सरकारचे म्हणणे आहे, त्यामुळे सरकार वापरापेक्षा जास्त साठा करेल. खरीप पिकांसाठी खतांच्या उपलब्धतेत … Read more

बैलगाडी शर्यतीत विहीरीत पडून दोन बैलांचा मृत्यू

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके कोरेगाव तालुक्यात बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या शर्यतीदरम्यान बैलगाडा आणि बैलजोडी विहिरीत पडून दोन बैलांचा जागीच तडफडून मृत्यू झाला आहे. विहिरीत बैलजोड्या विहरीत पडलेल्या असून अडकून राहिलेल्या आहेत. स्थानिकांच्या मदतीने मृत बैल बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कोरेगाव तालुक्यातील बिचुकले येथे बैलगाडी … Read more

सातबारा उतारा बंद होणार; भूमिअभिलेख विभागाचा निर्णय

satbara

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सातबारा उतारा रद्द करण्याचा निर्णय सरकार कडून घेण्यात आला आहे. पण हा निर्णय फक्त वाढत्या शहरांसाठी आहे. वाढत्या शहरीकरणामुळे आता शहरात शेतजमिनीच शिल्लक राहिलेल्या नाहीत त्याठिकाणचा सातबारा बंद करण्याचा निर्णय भूमिअभिलेख विभागाने घेतला आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये सिटी सर्व्हे होऊन देखील सातबारा देणे हे सुरुच आहे. त्यामुळे अशा शहरांमध्ये सातबारा देण्याचे … Read more