PM Kisan : शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार 2000 रुपये, किती तारखेला येणार 11 वा हप्ता? जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पीएम किसान योजनेचा (PM Kisan Sanman Niidhi Yojana)११ वा हप्ता कधी जमा होणार याची अनेक शेतकरी वाट पाहत आहेत. या महिन्याच्या अखेरपर्यंत याबाबत केंद्र सरकारकडून माहिती दिली जाऊ शकते. मी महिना अखेर पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात ११ व्या हप्त्याचे २००० रुपये जमा होऊ शकतात अशी शक्यता आहे. अद्याप अनेक शेतकऱ्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्याने ११ व हप्ता रखडला गेला आहे.

लाभार्थी शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे आवश्यक आहे. मोदी सरकारने ई-केवायसीची अंतिम मुदत ३१ मे २०२२ पर्यंत वाढवली आहे. यापूर्वी ही मुदत ३१ मार्च २०२२ होती. मात्र नंतर ती वाढवण्यात आली. जेणेकरून बहुतांश शेतकरी वेळेत ई-केवायसी करू शकतील.

केंद्र सरकारने पीएम किसान योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी त्यांचे eKYC पूर्ण करणे अनिवार्य केले आहे. आता शेतकऱ्यांना 11व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 10 हप्ते पोहोचले आहेत. सरकार मे महिन्यात 11 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करू शकते अशी शक्यता आहे. याबात सरकार लवकरच तारीख जाहीर करेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. PM Kisan

विशेष म्हणजे, केंद्राने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना लवकरात लवकर eKYC पूर्ण करण्यास सांगितले आहे. eKYC प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच 11 व्या हप्ताचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होऊ शकतील असं सांगण्यात आले आहे. त्यामुळे अद्याप तुम्ही हे काम केले नसेल तर ते तात्काळ करा. अन्यथा तुम्हाला ११ वा हप्ता मिळू शकणार नाही.

वेबसाइट किंवा मोबाईल फोनवर eKYC कशी करायची? (PM Kisan)

तुम्ही पीएम किसान मोबाईल अॅपच्या मदतीने किंवा लॅपटॉप किंवा संगणकाद्वारे घरी बसून eKYC तपशील ऑनलाइन पूर्ण करू शकता.
यासाठी PM किसान पोर्टल https://pmkisan.gov.in/ वर जा.
येथे तुम्हाला प्रथम शेतकरी कोपऱ्यावर eKYC ची लिंक दिसेल, त्या लिंकवर क्लिक केल्यावर तुम्हाला आधार क्रमांक विचारला जाईल.
येथे तुमचा आधार क्रमांक आणि इमेज कोड टाका आणि शोध बटणावर क्लिक करा. यानंतर मोबाईल नंबर टाका, इथे लक्षात घेण्याजोगा मुद्दा असा आहे की तुम्हाला तोच नंबर टाकावा लागेल जो आधारशी लिंक आहे.
यानंतर OTP टाका. त्यानंतर तुमचे eKYC पूर्ण होईल. जर तुम्हाला ई-केवायसी पूर्ण करण्यात काही अडचण येत असेल तर तुम्ही आधार सेवा केंद्राशी संपर्क साधू शकता.

हे पण वाचा –

Bajaj CT 100 : किंमत एकुण तुम्हाला विश्वास बसणार नाही, 1 लिटर पेट्रोलमध्ये 90 कि.मी. जाते

परदेशात शिक्षण घेऊन भारतात आला, आता ‘या’ फळाची शेती करुन कमावतोय लाखो..1200 रु किलो ने विक्री

इलेक्ट्रिक विमान ते चंद्रावर शहर… ; एलोन मस्क यांच्या डोक्यातील ‘या’ 5 कल्पनांचा तुम्ही विचारही केला नसेल

PM Kisan Mandhan Yojana :’या’ शेतकऱ्यांना दरमहा मिळेल 3000 रुपयांची पेन्शन, जाणून घ्या तपशील

PM Kisan मधील पैशांचे स्टेटस कसे तपासायचे ते जाणून घ्या