लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याकडून 200 रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग

Loknete Balasheb Karkhana Patan

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यांस सन 2020-21 च्या गळीत हंगामात गाळप केलेल्या ऊसबिलापोटी लोकनेते बाळासाहेब देसाई सह. साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकरी सभासदांना एफआरपीचीच्या हप्त्यापोटी आत्तापर्यंत प्रतिटन 2 हजार 330 रुपयांप्रमाणे होणारी रक्कम ऊस उत्पादकांच्या बँक खात्यावर यापुर्वीच वर्ग केली असून प्रतिटन 200 रुपये प्रमाणे होणारा एफआरपीपोटीचा हप्ता मंगळवार दि. 24 ऑगस्ट 2021 रोजी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केला असल्याची … Read more

पद्मश्री बनबिहारी निंबकर यांचे वृद्धापकाळाने निधन

फलटण | येथील निंबकर अ‍ॅग्रीकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूटचे संस्थापक, प्रसिद्ध कृषी शास्त्रज्ञ व सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री बनबिहारी निंबकर यांचे वयाच्या 90 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. आपल्या निंबकर कृषी संशोधन संस्थेच्या माध्यमातून शेतीतील प्रगत संशोधनासाठी ते अविरत कार्यरत होते. त्यांच्या विविधांगी कार्याबद्दल सन 2006 साली भारत सरकारकडून त्यांना ‘पद्मश्री’ किताबाने सन्मानित करण्यात आले होते. बनबिहारी यांनी … Read more

फुकटात ढबू घ्या ढबू! शेतकऱ्याने ट्रॉलीभर ढबू मिर्ची फुकट वाटली?

सांगली |  दर पडल्याने शेतकऱ्याने फुकट ट्रॉलीभर ढबू मिर्ची फुकट वाटून टाकली. सांगली जिल्ह्यातील कुंभारगाव येथे हा प्रकार घडला. ढबू मिरचीचा दर कोसळल्याने शेतकरी भीमराव साळुंखे यांनी नाईलाजाने मिर्ची फुकट वाटली. ट्रॉलीभर ढबू मिरची अवघ्या २० मिनिटांत संपली. या प्रकाराने शेतकऱ्याची दुर्दशा पुन्हा समोर आली आहे. करोनाचा संसर्ग, लॉकडाऊन आणि महापुरानंतर हळूहळू जीवन पूर्वपदावर येत … Read more

बैलगाडी शर्यत झालीच : गोपीचंद पडळकरांचा पोलिसांना चकवा, सागर-सुंदर जोडीने मैदान मारत पटकाविले 1 लाख 11 हजारांचे बक्षीस

सांगली | बैलगाडा शर्यतीसाठी बंदी असतानाही भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी बैलगाडा शर्यत पार पाडून दाखवली आहे. आटपाडी तालुक्यातील निंबवडे- वाक्षेवाडी गावांच्या दरम्यान असलेल्या पठारावर पहाटे शर्यती झाल्या असल्याचं सांगण्यात येत आहे. शर्यत संपन्न झाल्याचं सांगताच पडळकर समर्थकांनी एकच जल्लोष केला. पोलिसांच्या चोख बंदोबस्ताला चुकवून गनिमी काव्याने आंदोलन संपन्न झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे. … Read more

जावलीतील शेतकऱ्यांना आ. शिवेंद्रसिहराजेंकडून स्वःखर्चाने साहित्य वाटप

मेढा | जावली तालुक्याला अतिवृष्टीच्या आस्मानी संकटाने तालुक्यातील शेतकऱ्यांवर संकटाचा डोंगर कोसळला आहे. अतिवृष्टीच्या तडाख्याने हवालादिल झालेल्या जावलीतील बळीराजाच्या शेतीची दैना झाली आहे. तर शेतातील विहीरीवरील मोटारीचे व तत्सम पाईपचे प्रचंड नुकसान झालेले आहे. नादगणे, वाहीटे, भुतेघर तसेच पश्चिम जावलीच्या गावांना स्वःखर्चातून आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी साहित्य पुरविले आहे. अद्याप प्रशासकीय मदत आलेली नाही. अतिवृष्टीने … Read more

पुणे – मिरज- लोंढा रेल्वे दुहेरीकरण : रेल्वेचा शेतकऱ्यांना जमिनीच्या पाचपट मोबदल्याच्या चेकचे वाटप

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील पार्ले, बाबरमाची, सयापुर, यशवंतनगर, शिरवडे येथील शेतकऱ्यांना पुणे – मिरज- लोंढा रेल्वे दुहेरीकरणामध्ये संपादित होणाऱ्या जमिनिचा बाजारभावाच्या पाचपट बागायती जमिनीप्रमाणे मोबदला देण्यात आला आहे. प्रांताधिकारी उत्तम दिघे यांच्या हस्ते पार्ले येथील शेतकऱ्यांना मोबदल्याच्या चेकचे वाटप करण्यात आले. यावेळी रेल्वे आंदोलनाचे शेतकरी नेते सचिन नलवडे, प्रकल्प बाधित शेतकरी दिनकर … Read more

बिबट्याचे पिल्लू विकणे आहे : पठ्ठ्यानं फेसबुकवर टाकली जाहिरात अन पुढे झालं असं काही…

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी बिबट्याचे पिल्लू विकणे आहे, अशी फेसबुकवर जाहिरात करणाऱ्या एकाला वनविभागाने अटक केली आहे. शुक्रवारी दि.23 जुलै रोजी मिळालेल्या गुप्त माहितीवरून कराडच्या वनविभागाने कराड तालुक्यातील वसंतगड येथील ऋषीकेश शामराव इंगळे उर्फ लाल्या असे अटक केलेल्याचे नांव आहे. वनविभागाने दिलेली माहिती अशी, ऋषीकेश इंगळे उर्फ लाल्या (मूळ रा.म्हसवड सध्या रा. वसंतगड ता.कराड) … Read more

सातारा : पाटण तालुक्यात भूस्खलन झाल्याची घटना; अख्खं गाव खचल्याची माहिती

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पाटण तालुक्यात किल्ले मोरगिरी नावाच्या गावात भूस्खलन झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत अख्खं गाव खचल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे संपूर्ण गाव तातडीनं इतरत्र हलवण्याचे आदेश प्रशासनानं दिलेले आहेत. गावातील बहुतांश गावकरी सध्या गाव सोडून सुरक्षित ठिकाणी निघून गेले असल्याची माहिती तहसिलदार योगेश टोम्पे यांनी दिली आहे. पाटण शहरापासून 15 … Read more

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे रमले शेतात; भर पावसात केली भात लागण

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके राज्यात सध्या ठिकठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे पिकांसाठी तो लाभदायक ठरत आहे. साताऱ्याच्या पश्चिमेकडे सध्या भात लावण्याची लगबग सुरू आहे. या परिसरातील डोंगर पायथा लागत असलेल्या शेतकऱ्यांचे प्रमुख पीक भात असून पावसाने दडी मारल्याने परिसरातील भात लागण रखडली होती. मात्र, सध्या चांगल्या प्रकारे पाऊस पडू लागल्यामुळे शेतकऱयांकडून भातलागणीला सुरुवात करण्यात … Read more

शेतकऱ्यांमध्ये खळबळ : वाईत डॉक्टरांच्या बेमुदत संपामुळे 36 हजार पशुधन धोक्यात

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके वाई तालुक्यातील सरकारी १२ आणी खाजगी ३२ जनावरांच्या डॉक्टरांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी आणी राज्य सरकारला वटणीवर आणण्यासाठी शुक्रवारपासून बेमुदत संप पुकारल्याने ११७ गावातील ३६ हजार जनावरांचे आरोग्य धोक्यात सापडल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. बेमुदत पुकारलेल्या या संपाचे निवेदन वाई तालुका पशुवैदकीय डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष डॉ. … Read more