राज्यात पीक साठवणुकीसाठी उभी करा शीतगृहे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कांद्याप्रमाणे ज्या पिकांना साठवणुकीची गरज आहे त्यासाठी राज्यभर साठवणूक केंद्र, शीतगृहांची उभारणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी कृषी विभागाला दिले आहेत. ग्रामीण भागातील लहान शेतकऱ्यांसाठी पायाभूत सुविधा उभारण्याकरिता शेतकरी उत्पादक कंपन्यांनी पुढे यावे, असे आवाहनही यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. राज्य शासन, नाफेड आणि महाएफपीसी यांच्या माध्यमातून … Read more

आता उसापासून होईल इथेनॉल निर्मिती, ज्याने कमी होईल पेट्रोल डिझेलची आयात

sugarcane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यंदाही राज्यातील उसाचे क्षेत्र वाढले असून भविष्यात साखरेचे उत्पादन कमी करुन २५ टक्के ऊसापासून इथेनॉल निर्मितीवर भर देण्यात यावा या विषयावर आज साखर क्षेत्रातील विविध तज्ज्ञांसोबस अनौपचारिक चर्चा करण्यात आली आहे. यावर मुख्यमंत्र्यांसह इतर संबंधित खात्याचे प्रमुख मंत्रिमंडळात निर्णय घेतील, अशी माहिती वसंतदाद साखर … Read more

नुकत्याच संमत कृषी कायद्यांना काँग्रेस खासदाराचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान

agriculture law

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रपतींनी नुकत्याच मंजूर केलेल्या तीन नव्या कृषी कायद्यांना केरळचे काँग्रेस खासदार टी. एन. प्रतापन यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या कायद्यातील तरतुदींच्या घटनात्मक वैधतेवर प्रश्नचिन्ह लावले आहे. या कायद्यांमुळे समांतर अनियंत्रित बाजार व्यवस्था निर्माण होणार असल्याचा आरोप त्यात केला आहे. मोदी सरकारने आणलेल्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. अनेक … Read more

शेतकऱ्यांची कांदा बियाणांसाठी लगभग

onion seed

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रब्बी कांदा लागवडीची लगबग सुरु झाली असून शेतकऱ्यांची बियाणे उपलब्ध करून घेण्यासाठी ओढाताण सुरु आहे. सध्या कांदा बियाणे मिळत नसल्याने शेतकरी सर्वत्र शोधाशोध करीत आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाकडे उपलब्ध असलेले तीन-चार क्विंटल बियाणे केंव्हाचेच विकून झाले आहे. बाजारपेठेत कांद्याला मिळत असलेले दर तसेच आगामी काळातील भावाचा कल लक्षात घेत … Read more

हमी भावाने उडीद खरेदीला १ ऑक्टोबरपासून सुरुवात – बाळासाहेब पाटील

Balasaheb patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत हमी भावाने उडीद खरेदीला दि.१ ऑक्टोबर २०२० पासून सुरुवात होणार आहे, अशी माहिती पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. श्री.पाटील म्हणाले, केंद्र शासनाने उडीदसाठी हमी भाव प्रती क्विंटल ६ हजार रुपये जाहीर केला आहे. चालू हंगामात उडीद आवक बाजारात सुरु झाली आहे.

बाजारभाव हमीभावापेक्षा कमी असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी खरेदी केंद्र सुरू करण्यात येत आहेत. खरेदी केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी दि. १५ सप्टेंबर २०२० पासून नोंदणी प्रक्रिया सुरु झाली आहे. नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना नोंदणीच्या क्रमवारीनुसार उडीद खरेदी केंद्रावर आणण्यासाठी एसएमएसद्वारे कळविण्यात येईल. ज्या केंद्रावर नोंदणी केली आहे त्याच केंद्रावर एसएमएस आल्यानंतरच शेतकऱ्यांनी शेतमाल घेऊन यावा. सर्व खरेदी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.

शेतकऱ्यांनी आपआपल्या तालुक्यातील खरेदी केंद्रावर नोंदणी करावी. नोंदणीकरिता आधारकार्डाची छायांकित प्रत आणि पिकाची नोंद असलेला सातबारा उतारा सादर करावा. तसेच शेतकऱ्यांनी मोबाईल नंबर खरेदी केंद्रावर नोंदवावा. केंद्र शासनाकडे हमीभावाने उडीद खरेदीच्या मान्यतेचा प्रस्ताव दि.३१ ऑगस्ट २०२० ला पाठविण्यात आला होता त्या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे, असेही श्री.पाटील यांनी यावेळी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Read more

शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड असेल तर मिळेल कमी व्याजदरात कर्ज

kisan credit card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शेतकरी बांधवांनांसाठी सरकारने सुरु केलेली किसान क्रेडिट कार्डची सुविधा ही खूप लाभकारक आहे. शेतकऱ्यांना वेळेवरती पैसाची मदत व्हावी, शेती साहित्य घेण्यासाठी किसान क्रेडिट कार्डचा उपयोग होत असतो. यासह किसान क्रेडिट कार्डवरुन कर्ज घेतल्यास बँक त्याला कमी व्याजदर आकारत असते. बँक साधरण ९ टक्के व्याज आकरत असते. परंतु सरकार यात २ टक्क्यांची … Read more

सर्वसामान्यांसाठी धक्का !! राज्यात पालेभाज्यांचे दर वाढले

leafy vegetables

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मार्च महिन्यापासून देशात लोकडाऊन सुरू होते, दरम्यान मागील दोन महिन्यापासून टप्प्याटप्प्याने सगळे व्यवहार चालू करण्यात येत आहेत. परंतु मागील काही महिन्यांपासून महाराष्ट्रात सर्वदूर मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे शेतात पाणी तुंबल्याने बहुतांश पिके सडून खराब झाले आहेत. त्याला भाजीपालाही अपवाद नाही. याचमुळे बाजारात भाज्यांची आवक घटली आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी लावलेल्या भाजीपाला … Read more

सोयाबीन खरेदी नोंदणीची सुरुवात १ ऑक्टोबर पासून होणार सुरु; ३ हजार ८८० रुपये हमी भाव जाहीर

Soyabeen

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठीची नोंदणी १ ऑक्टोबर पासून सुरु होणार आहे. प्रत्यक्ष खरेदीला सुरुवात १५ ऑक्टोबर २०२० पासून होणार आहे. शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर नोंदणी करण्याचे आवाहन पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे. पाटील यांनी सांगितले की, केंद्र शासनाने प्रती क्विंटलप्रमाणे सोयाबीन हमी भाव ३ … Read more

कांदा उत्पादकांसाठी खुशखबर! कांदाचाळ उभारणीसाठी सरकारने मंजूर केले ६० कोटी अनुदान

Kanda Chal Anudan Yojana 2020

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. कांदा चाळ उभारणीसाठी राज्यसरकारने ६० कोटी रुपयांचा निधी मंजुर केला आहे. राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली २७ व्या राज्यस्तरीय प्रकल्पाला मंजूरी देण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत एकूण रू. १५० कोटींचा कार्यक्रम राबविण्यात येणार असून राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत अर्थसहाय्याच्या स्वरुपात ६० कोटी रुपयांचा … Read more

अवघ्या चोविसाव्या वर्षी घेतले टेरेसगार्डनवर विविध भाज्या, मसाले आणि फुलांचे पीक 

anubhav sharma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। सध्याच्या काळात अनेकजण टेरेस गार्डन, किचन गार्डन तसेच विविध प्रकारच्या गार्डनिंग कडे वळलेले पाहायला मिळतात. तरुण पिढीही मोठ्या प्रमाणात यात रस घेताना दिसून येते आहे. उत्तर प्रदेश मधील रायबरेली जिल्ह्यात राहणाऱ्या एका २४ वर्षाच्या मुलानेही आपली ही आवड जपत टेरेस गार्डन फुलविले आहे. अनुभव शर्मा असे त्याचे नाव आहे. तो सध्या पदवी … Read more