धक्कादायक ! शिकाऊ एअर हॉस्टेसवर इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचा बलात्कार

Rape
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

गांधीनगर : वृत्तसंस्था – गुजरातमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. 20 वर्षीय प्रशिक्षणार्थी एअर हॉस्टेसला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे. या प्रकरणी इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या तरुणाला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. आरोपीची आणि पीडित महिलेची इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती.

काय आहे प्रकरण?
अहमदाबाद शहराच्या पूर्व भागात राहणारी पीडित तरुणीची ओळख सुमारे सात महिन्यांपूर्वी इन्स्टाग्रामवर वेजलपूरचा रहिवासी असलेल्या जीत त्रिवेदी या व्यक्तीशी झाली होती. हे दोघेही नियमितपणे सोशल मीडियावरुन एकमेकांच्या संपर्कात होते अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं?
पीडित तरुणीने पोलिसांना सांगितले कि, चार महिन्यांपूर्वी जीत त्रिवेदीने तिला वेजलपूर येथील त्याच्या घरी बोलावले. तिथे त्याने तिला शीतपेय आणि नाश्ता दिला. त्यानंतर, तिला चक्कर येऊ लागली आणि तिची शुद्ध हरपली.

बलात्काराचे फोटो-व्हिडीओ काढून दिली धमकी
या पीडित तरुणीला जेव्हा जाग आली तेव्हा जीतने तिला सांगितले की त्याने तिच्याशी लैंगिक संबंध ठेवले. तिने या घटनेबद्दल कोणाला सांगितले तर तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. जेव्हा तिने त्याला विनवणी केली तेव्हा जीतने तिला मारहाण केल्याचा आरोप या तरुणीने केला आहे.

ब्लॅकमेल करत तीन वेळा अत्याचार
यानंतर आरोपी सतत तिला ब्लॅकमेल करत राहिला आणि तिच्यावर त्याने तीन वेळा जबरदस्ती केली. या घटनेचा तिच्यावर मानसिक परिणाम झाला जो तिच्या कुटुंबीयांच्या लक्षात आला. त्यानंतर पीडितेने आपल्याबाबत घडलेला सर्व प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितला. यानंतर कुटुंबीयांनी आरोपीविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली.