अहमदनगर प्रतिनिधी। नगर तालुक्यातील धनगरवाडी येथे माय-लेकीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार (दि.29) रोजी उघडकीस आली होती. मात्र, या घटनेच्या तपासात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
आईनेच लेकीला विहीरीत टाकुन जीवे ठार मारले असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.याबाबत मयत आरोपी निता ऊर्फ कविता सचिन पालवे यांच्या विरोधात नागापूर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, धनगरवाडी येथील नीता उर्फ कविता सचिन कापडे (वय- 27, रा. धनगरवाडी ता.नगर), व मुलगी प्रणाली सचिन कापडे (वय- 4) यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी (दि.28) रोजी रात्री नीता कापडे व मुलगी प्रणाली यांनी स्वतःच्या घराला कडी लावून घराबाहेर पडल्या.
सकाळी दोघी मायलेकी निदर्शनास आल्या नाही. त्यानंतर घरच्यांनी शोधाशोध केली असता, जवळच पाचशे मीटर अंतरावर असलेल्या एक विहिरीमध्ये दोघींचे मृतदेह आढळून आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, आईने कोणत्यातरी गोष्टीचा राग मनात धरून मुलीला विहिरीत टाकून तीला जीवे ठार मारले, व स्वता: विहीरीत उडी घेवून आत्महत्या केली असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात सहायक फौजदार श्रीधर पालवे यांनी फिर्याद दिली आहे.