नवी दिल्ली । कर्जबाजारी झालेल्या सरकारी विमान कंपनी एअर इंडियाला विकण्याचा सरकारचा प्रयत्न अखेर यशस्वी झाला. दीर्घ प्रतीक्षेनंतर एअर इंडियाची कमांड टाटा ग्रुपकडे सोपवण्यात आली आहे. नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी शुक्रवारी सांगितले की,” टाटा ग्रुपला एअर इंडियाची झालेली विक्री ही एअरलाइनसाठी नवीन पहाट आहे आणि त्यांना आशा आहे की, हे विमान वाहक यशस्वी ऑपरेशनद्वारे लोकांना जवळ आणत राहील.”
सिंधिया यांनी ट्वीट केले, “टाटा ग्रुपकडे एअर इंडियाचे परत येणे ही विमान कंपन्यांसाठी एक नवीन पहाट आहे ! नवीन व्यवस्थापनासाठी माझ्या शुभेच्छा, आणि सचिव दिपम आणि नागरी उड्डयन मंत्रालयाचे अभिनंदन, एअरलाईनसाठी नवीन रनवे बांधण्याचे कठीण काम यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल. ”
Air India’s return to @TataCompanies marks a new dawn for the airline! My best wishes to the new management, and congratulations to @SecyDIPAM & @MoCA_GoI for successfully concluding the difficult task of paving a new runway for the airline to take off!
1/2— Jyotiraditya M. Scindia (@JM_Scindia) October 8, 2021
सरकारी कंपन्यांच्या खाजगीकरणासाठी जबाबदार असलेल्या डिपार्टमेंट ऑफ इन्वेस्टमेंट अँड पब्लिक एसेट मॅनेजमेंट (DIPAM) सचिव तुहिनकांत पांडे यांनी सांगितले की, टाटा ग्रुपची होल्डिंग कंपनी टाटा सन्सचे स्पेशल युनिट (SPV) आहे. यशस्वी बोलीदार म्हणून निवड झाली आहे.
एअर इंडिया मिळवण्याच्या शर्यतीत टाटा सन्सने स्पाइसजेटचे प्रमोटर्स अजय सिंग यांच्या नेतृत्वाखालील कंपनीला हरवले. DIPAM च्या सेक्रेटरीने सांगितले की, “टाटाच्या 18,000 कोटी रुपयांच्या बोलीमध्ये 15,300 कोटी रुपयांचे कर्ज घेणे आणि उर्वरित रक्कम रोखीने भरणे समाविष्ट आहे.”