25 हजार रुपयांत करा युरोपची सैर; Air India ने आणली खास ऑफर

Europe tour air india
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो  महाराष्ट्र ऑनलाईन | देशातील सर्वात मोठी एअरलाईन्स कंपनी Air India ने आपल्या प्रवाश्यांसाठी खास ऑफर आणली आहे. देशातील प्रवाश्यांना युरोपीय देशातील ठराविक काही ठिकाणी जाण्याकरिता ही ऑफर आणण्यात आली आहे. या ऑफरनुसार एअर इंडियाच्या प्रवाश्यांना स्वस्तात तिकिटे उपलब्ध करून  दिली जाणार आहेत. ज्याच्या माध्यमातून एअर इंडियाचे प्रवासी फक्त 25 हजार रुपयात युरोपला जाऊ शकतात.

काय आहे ऑफर ?

एअर इंडियाने जाहीर केलेली ही ऑफर युरोपातील फक्त पाच शहरांमध्ये जाण्यासाठी असणार आहे. युरोपमध्ये ब्रिटनमधील लंडन, डेन्मार्कमधील कोपनहेगन, इटलीमधील मिलान, फ्रान्समधील पॅरिस आणि ऑस्ट्रियामधील व्हिएन्ना या शहरांत जाण्यासाठी असणाऱ्या एअर इंडियाच्या विमानासाठी ही ऑफर  देण्यात आली आहे. वन वे ट्रिप साठी ऑफरनुसार 25 हजार रुपयांपासून तिकीट उपलब्ध असणार आहे. तर राऊंड ट्रिपसाठी 40 हजार रुपयांपासून तिकीट उपलब्ध असणार आहे.

कधी पर्यंत असणार ऑफर उपलब्ध :

एअर इंडिया नवी दिल्ली आणि मुंबई येथून या पाच युरोपीय शहरांसाठी दर आठवड्याला ४८ नॉन-स्टॉप उड्डाणे चालवते. एअर इंडियाची ही स्वस्त तिकीट ऑफर ११ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर २०२३ पर्यंत सुरू असून प्रवासी या ऑफर अंतर्गत १५ डिसेंबर २०२३ पर्यंत प्रवास करू शकतात.