हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Airtel च्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. आता ग्राहकांना एअरटेल थँक्स अॅपद्वारे एअरटेल मोबाइल/डीटीएच रिचार्ज, एअरटेल ब्लॅक आणि एअरटेल एक्सस्ट्रीम फायबर पेमेंटवर दरमहा 300 रुपयांची बचत करता येऊ शकेल. मात्र, दरमहा 300 कॅशबॅक मिळविण्यासाठी, आपल्याकडे Airtel Axis Bank चे क्रेडिट कार्ड असायला हवे. हे जाणून घ्या कि, गेल्या वर्षी भारती एअरटेल आणि अॅक्सिस बँकेकडून हे क्रेडिट कार्ड लाँच करण्यात आले होते.
हे एक को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड आहे. तसेच ते व्हिसा कार्ड स्वीकारणाऱ्या सर्व मर्चंट आउटलेट किंवा ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर वापरता येते. एअरटेल थँक्स अॅपवर हे क्रेडिट कार्ड वापरून ग्राहकांना मोठा फायदा मिळू शकेल. याशिवाय जर आपण झोमॅटो आणि स्विगी सारख्या अॅपवरून फूड ऑर्डर करत असाल तर त्यासाठी देखील हे क्रेडिट कार्ड एक चांगला पर्याय ठरू शकेल.
जाणून घ्या ‘या’ कार्डचे फीचर्स
Airtel Axis Bank क्रेडिट कार्ड जारी केल्यापासून 30 दिवसांच्या आत अॅक्टिव्हेशन केल्यानंतर ग्राहकांना 500 रुपयांचे Amazon व्हाउचर मिळेल.
एअरटेल Axis Bank क्रेडिट कार्डद्वारे ग्राहकांना Swiggy, Zomato आणि Bigbasket वर खर्च केल्यास 10 टक्के कॅशबॅक मिळेल.
यासोबतच क्रेडिट कार्ड धारकांना इतर सर्व खर्चांवर 1% कॅशबॅक मिळेल.
एअरटेल Axis Bank क्रेडिट कार्डद्वारे Airtel Thanks अॅपवर Airtel Mobile/DTH रिचार्ज, ब्रॉडबँड आणि वाय-फाय पेमेंटवर 25% कॅशबॅक मिळेल. (एका महिन्यात जास्तीत जास्त 300 रुपयांचा कॅशबॅक)
ग्राहकांना एअरटेल अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डद्वारे एअरटेल थँक्स अॅपद्वारे वीज, गॅस किंवा पाणी बिल पेमेंटवर 10% कॅशबॅक मिळेल. (एका महिन्यात जास्तीत जास्त 300 रुपयांचा कॅशबॅक)
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.axisbank.com/retail/cards/credit-card/airtel-axis-bank-credit-card/features-benefits
हे पण वाचा :
Property Tax म्हणजे काय ??? ते भरण्याचे फायदे जाणून घ्या
एप्रिलपासून Life Insurance पॉलिसी महागणार, जाणून घ्या यामागील कारणे
FD Rates : ‘या’ बँकांच्या एफडीवर मिळतो आहे सर्वाधिक व्याजदर, तपासा लिस्ट
Pan Card नसेल तर FD वर द्यावा लागेल दुप्पट टॅक्स, जाणून घ्या त्याबाबतचा नियम
Post Office च्या ‘या’ योजनांमध्ये 1 एप्रिलपासून होणार तीन मोठे बदल