नवी दिल्ली । आज आम्ही तुम्हाला एअरटेलच्या अशा ऑफरबद्दल सांगणार आहोत, ज्यात तुम्ही काहीही न करता थेट 4 लाख रुपयांचा लाभ घेऊ शकता. वास्तविक, कंपनी तुम्हाला रिचार्ज स्कीमवर 4 लाख रुपयांचा थेट फायदा देत आहे. 279 रुपयांच्या रिचार्ज प्लानवर हा लाभ उपलब्ध आहे. जरी जीवन विमा किंवा आरोग्य विम्याचा लाभ घेण्यासाठी प्रीमियम भरावा लागत असला तरी काही कंपन्या किंवा सरकारी योजना तुम्हाला जीवन किंवा आरोग्य विमा फ्रीमध्ये देतात. चला तर मग त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात …
एअरटेल देते आहे 4 लाख टर्म लाइफ इन्शुरन्स
एअरटेल त्याच्या दोन प्रीपेड रिचार्जसह फ्री टर्म लाइफ इन्शुरन्स देते. हे 279 आणि 179 रुपयांचे रिचार्ज प्लॅन आहेत. 279 रुपयांच्या या योजनेवर 4 लाख रुपयांचा टर्म लाइफ इन्शुरन्स इतर फायद्यांसह उपलब्ध आहे. त्याचबरोबर 179 रुपयांच्या प्रीपेड रिचार्जवर 2 लाखांचा लाइफ इन्शुरन्स आहे.
जन धन खात्यावर इन्शुरन्स
जन धन योजने अंतर्गत, 30 हजार रुपयांचे लाइफ इन्शुरन्स कव्हर आणि खुल्या बँक खात्यासह उपलब्ध असलेल्या रुपे डेबिट कार्डवर 2 लाख रुपयांचे पर्सनल ऍक्सिडेंटल इन्शुरन्स कव्हर उपलब्ध आहे.
PNB देते फ्री ऍक्सिडेंटल इन्शुरन्स
पंजाब नॅशनल बँक रुपे प्लॅटिनम डेबिट कार्डवर 2 लाख रुपयांचा फ्री ऍक्सिडेंटल इन्शुरन्स देते. यासह, आपल्याला अनेक स्पेशल फायदे देखील मिळतील.
EPFO 7 लाख रुपयांचे विमा संरक्षण देते
EPFO सदस्यांना एम्प्लॉई डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स स्कीम (EDLI Insurance cover) अंतर्गत लाइफ इन्शुरन्स कव्हरची सुविधा देखील मिळते. या योजनेमध्ये नॉमिनी व्यक्तीला जास्तीत जास्त 7 लाख रुपयांचे इन्शुरन्स कव्हर दिले जाते.
LPG वर 50 लाखांचा इन्शुरन्स
LPG कनेक्शनसह, ग्राहकाला पर्सनल ऍक्सिडेंटल कव्हर मिळते. LPG सिलेंडरमधून गॅस गळती किंवा स्फोट झाल्यामुळे दुर्दैवी अपघात झाल्यास 50 लाख रुपयांपर्यंतचा हा इन्शुरन्स आर्थिक मदतीच्या स्वरूपात आहे.