कौतुकास्पद ! कोल्हापूरच्या ऐश्वर्या जाधवची विम्बल्डन स्पर्धेसाठी आशियाई संघात निवड

aishwarya jadhav
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आशियाई टेनिस फेडरेशनतर्फे इंग्लंडमधल्या विम्बल्डन स्पर्धेसाठी कोल्हापूरच्या ऐश्वर्या जाधवची (aishwarya jadhav) निवड झाली आहे. एक जुलैपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे, यास्पर्धेतल्या आशियाई टीममध्ये असलेली ऐश्वर्या (aishwarya jadhav) ही एकमेव भारतीय आहे. क्रिकेटमध्ये लॉर्ड्सच्या मैदानाला ज्याप्रमाणे मानाचं स्थान आहे, त्याचप्रमाणे टेनिसमध्ये विम्बल्डन ग्रास कोर्ट्सना मोठं स्थान आहे. इथे खेळण्याचं स्वप्न जगभरातले खेळाडू पाहत असतात. ऐश्वर्याचं हे स्वप्न अगदी लहान वयातच पूर्ण होत आहे.

अंडर-14 मध्ये आहे ‘नंबर वन’
14 वर्षं वयोगटातल्या मुलींमध्ये ऐश्वर्या (aishwarya jadhav) सध्या भारतातली पहिल्या क्रमांकाची टेनिस खेळाडू आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासूनच ती विविध स्पर्धांमध्ये जिंकत आली आहे. एप्रिलमध्ये दिल्ली येथे झालेल्या आशिया/ओशियानिया वर्ल्ड ज्युनियर टेनिस कॉम्पिटिशन या स्पर्धेत तिने नेत्रदीपक कामगिरी केली होती. तसेच तिने कोल्हापुरातच झालेल्या अंडर-16 ज्युनियर टेनिस नॅशनल्स स्पर्धेत डबल्स प्रकारात तिने विजय मिळवला होता.

राज्याचा आणि कोल्हापूरकरांचा कायम पाठिंबा
ऐश्वर्याने (aishwarya jadhav) अर्शद आणि मनल देसाई या भावंडांच्या ‘अर्शद देसाई टेनिस अ‍ॅकॅडमी’मध्ये प्रशिक्षण घेतलं आहे. “कोल्हापूरसारख्या छोट्या शहरातून थेट विम्बल्डनला जाणं ही खरंच मोठीझेपआहे. ऐश्वर्याने ती उत्तम टेनिसपटू आहे हे वेळोवेळी दाखवून दिलं आहे. हा क्षण आमच्यासाठी प्रशिक्षक म्हणून अगदी अभिमानाचा आहे,” असे मत ऐश्वर्याचे प्रशिक्षक अर्शद देसाई यांनी व्यक्त केले आहे. ऐश्वर्याच्या या प्रवासात महाराष्ट्र स्टेट लॉन टेनिस असोसिएशन आणि कोल्हापूरच्या नागरिकांचाही भरपूर पाठिंबा आहे.

हे पण वाचा :
महाविकास आघाडीच्या आमदारांच्या बैठकीत शरद पवारांनी केले ‘हे’ आवाहन; म्हणाले…

पैगंबर वादाचे पडसाद; अल- कायदाची मुंबई- दिल्लीत आत्मघातकी हल्ल्याची धमकी

खेळता खेळता बोअरवेलमध्ये पडला चिमुकला; जवानांनी वाचवला जीव

‘जय शिवाजी’, ‘हरहर महादेव’ म्हणत कोल्हापूरच्या 80 वर्षांच्या आजीने सर केला रायगड

Sarfaraz Khan ने रचला इतिहास, ब्रॅडमननंतर ‘हा’ पराक्रम करणारा ठरला दुसरा खेळाडू