तंबाखूजन्य जाहिरातींमुळे अजय देवगन चर्चेत

0
52
Point Blur May
Point Blur May
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | आजवरच्या कारकिर्दीमध्ये सुपरहिट चित्रपट देणारा अभिनेता अजय देवगण जाहिरातींच्या माध्यमातून छोट्या पडद्यावरही झळकला आहे. अजयने आतापर्यंत अनेक जाहिरातींमध्ये काम केलं असून सध्या त्याच्या एका जाहिरातीमुळे तो चर्चेचा विषय ठरला आहे.

अजय गेल्या कित्येक काळापासून तंबाखू उत्पादनाच्या जाहिराती करत आहे. मात्र तंबाखूचा प्रचार होईल अशा जाहिराती करु नका, अशी विनंती त्याच्या एका कर्करोगग्रस्त चाहत्यांनी केली आहे. राजस्थानमध्ये राहणाऱ्या नानकराम या कर्करोगग्रस्त व्यक्तीने “समाजाच्या कल्याणासाठी तंबाखू उत्पादनाची जाहिरात करु नका”, असं आवाहन अजयला केलं आहे.

त्यासोबतच अजय देवगणला संबोधित करत जयपूरच्या सांगानेर, जगतपुरा आणि इतर जवळपासच्या परिसरामध्ये एक हजार पत्रक वाटले आणि भितींवर लावले आहेत. यामध्ये तंबाखूचं सेवन केल्याने त्याचे परिणाम आणि त्याच्यामुळे कुटुंबावर ओढावलेली स्थिती याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here