अजित आगरकर बनणार चीफ सेलेक्टर, बीसीसीआयने नाव केले शॉर्टलिस्ट!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । टीम इंडियाचा नवा चीफ सेलेक्टर निवडण्याची प्रक्रिया आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. बीसीसीआयने निवड समितीसाठी माजी क्रिकेटपटू अजित आगरकर याच्यासह एकूण 5 माजी क्रिकेटपटूंची निवड केली आहे. आगरकर व्यतिरिक्त बीसीसीआयने चेतन शर्मा, मनिंदरसिंग, नयन मोंगिया आणि एसएस दास यांची नावेही दिलेली आहेत.

अजित आगरकरला चीफ सेलेक्टर म्हणून निवडण्याचे का ठरवले आहे?
अजित आगरकरसह एकूण 11 खेळाडूंनी निवड समितीसाठी अर्ज दाखल केले होते. ज्यात अजित आगरकर, एबी कुरुविला आणि नयन मोंगिया यांनी पश्चिम विभागाकडून अर्ज केला आहे. उत्तर विभागातून चेतन शर्मा, मनिंदरसिंग, विजय दहिया, अजय रात्रा आणि निखिल चोप्रा यांनी अर्ज दाखल केले. पूर्व विभागातून शिव सुंदर दास, देवाशीश मोहंती आणि रणदेव बोस यांनी अर्ज केला. आता या 11 पैकी 5 क्रिकेटपटूंची निवड समितीसाठी सीएसीने निवड केली आहे. यामध्ये आगरकर, चेतन शर्मा, मनिंदर सिंग, नयन मोंगिया आणि एसएस दास यांचा समावेश आहे.

https://t.co/u0aAEA3fKl?amp=1

बीसीसीआयच्या नव्या घटनेनुसार फक्त जास्त कसोटी क्रिकेट खेळलेला क्रिकेटपटूच चीफ सेलेक्टर पदावर बसू शकतो. अजित आगरकरने या सर्व माजी क्रिकेटपटूंमध्ये सर्वाधिक 26 कसोटी सामने खेळले आहेत. याशिवाय आगरकरने भारताकडून 191 एकदिवसीय सामनेही खेळलेले आहेत आणि अशा परिस्थितीत 191 होण्यासाठी तो सर्वात मोठा दावेदार आहे. मदन लाल यांच्या अध्यक्षतेखालील क्रिकेट सल्लागार समिती शॉर्ट लिस्ट झालेल्या 5 उमेदवारांची मुलाखत घेईल, त्यापैकी 3 जण निवडले जातील. सध्याचे बीसीसीआय निवड समिती सदस्य जतीन परांजपे, देवांग गांधी आणि शरणदीप सिंग यांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे आणि त्यांची जागा पश्चिम विभागातील अजित आगरकर, पूर्व विभागातील शिवसंदर दास यांना मिळू शकेल. नवीन निवड समिती इंग्लंडविरुद्धच्या घरच्या मालिकेपासून आपले काम सुरू करेल.

https://t.co/49OJB222jI?amp=1

https://t.co/4qL38p73kR?amp=1

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.