हिवाळी अधिवेशनापूर्वी अजित पवार आक्रमक; राज्यपाल कोश्यारींबाबत सरकारकडे केली ‘ही’ मागणी

Ajit Pawar Bhagatsih Koshyari
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजपासून राज्याचं हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू होत आहे. अधिवेशनात शिंदे-फडणवीस सरकारची कसोटी लागणार आहे. अधिवेशनात महाराष्ट्रातील महापुरुषांचा मुद्दा चांगलाच गाजणार असून अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार चांगलेच आक्रमक झाले आहेत. महाराष्ट्रात महापुरुषांचा अपमान अजिबात सहन करणार नाही. राज्यपाल कोश्यारी यांना तत्काळ हटवून त्यांच्या जागी कोणालाही आणा, अशी मागणी अजित पवारांनी केली आहे.

नागपुरात होतात असलेल्या हिवाळी अधिवेशनात पहिला दिवस महत्वाचा मानला जातो. अधिवेशन सुरु होण्यापूर्वी विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राज्यपाल कोश्यारींविरोधात आम्ही मुंबईत हल्लाबोल महामोर्चा काढला होता. त्यांना पदावरून हटवा आणि दुसऱ्या कुणाला तिथे बसवा अशी आमची मागणी होती. राज्यपालपदी कोणत्या व्यक्तीला बसवावं हा केंद्राचा अधिकार आहे.

एकदा दोनदा चूक समजू शकतो. हे सातत्याने होत आहे. चुकून काही घडत नाही. अनेकजण हसत हसत विधाने करत आहेत. शिंदे फडणवीस यांचे हे सरकार महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न जाणीवपूर्वक चिघळवत आहेत हे कदापि सहन करणार नाही. त्यामुळे राज्याचे राज्यपाल कोश्यारी यांना तत्काळ हटवा आणि त्यांच्या जागी कोणालाही आणून बसवा.

राज्यात किती जणांचे मंत्रिमंडळ असावे यापेक्षा जनतेचा कारभार व्यवस्थित झाल्याची मतलब आहे. मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात आम्हाला खरोखरच रस नाही. आमचे म्हणणे अकधच आहार कि तुम्ही आज राज्यकर्ते झालेले आहात. शेतकऱ्याचे प्रश्न आहेत, पीक विम्याचे प्रश्न आहेत आज लोकांना अपेक्षा आहे तुमच्याकडून कि त्या पूर्ण कराव्यात. राज्यातील प्रकल्प गेलेले उभ्या महाराष्ट्राने पाहिलेले आहेत. उद्योग बाहेर जाणे हि गंभीर बाब आहे. यावर आता सरकारने उत्तर दिले पाहिजे, अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे.

भाजपच सरकार पाडण्याच्या तयारीत होते हे त्रिवार सत्य

ठाकरे सरकार पाडण्यात आमचा काही संबंध नाही. आम्ही नामानिराळे आहोत, असे भाजपकडून सुरुवातीला सांगितले जात होते. नंतर 15 -16 आमदार निघून गेले. आता अलिकडे भाजपमधील काही लोकांची वक्तव्ये आली आहेत. मीच आमदारांना गुवाहाटीला जाण्यासाठी फोन केले होते, असेही काहीजण म्हणाले. तर काहींच्या कुटुंबातील लोकांनी ते वेषभूषा करून कसे जायचे हे सांगितलं. फोन करून मी पाठवलं, वेशभूषा बदलून जात होते, बदला घेतला हे कोणी म्हटलं? हे सर्वांना माहीत आहे. याचा अर्थ सुरुवातीपासूनच ते सरकार पाडण्याच्या तयारीत होते. हे त्रिवार सत्य आहे, असे अजित पवार म्हणाले.