हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. कार्यकर्त्यांनी पवारांना आपला निर्णय मागे घेण्याची विनंती करूनही शरद पवार मात्र अजूनही आपल्या निर्णायावर ठाम आहेत. पवारांनंतर नवा अध्यक्ष कोण याबाबत अजित पवार, सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल यांची नाव आघाडीवर आहेत. याच दरम्यान, माजी आमदार शालिनीताई पाटील यांनी अजित पवारांवर निशाणा साधत सुप्रिया सुळे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष करण्यात यावे असे म्हंटल आहे.
अजित पवार हे घोटाळेबाज आहेत, ते अनेक गुन्ह्यात अडकलेले आहेत त्यामुळे त्यांना कधीही अटक होऊ शकते. अशा परिस्थितीत त्यांना पक्षाचे अध्यक्ष करणं योग्य नाही. त्यापेक्षा सुप्रिया सुळे यांना अध्यक्ष करावं, त्या सक्षम आहेत अस मत शालिनीताई पाटील यांनी व्यक्त केले आहे.
अजित पवार यांच्या पाठीशी भाजपच्या एका मोठ्या नेत्याचा हात आहे असा गंभीर आरोप शालिनीताई पाटील यांनी केला. हसन मुश्रीफ यांना 100 कोटीच्या मनी लॉन्ड्रीग प्रकरणात ईडी चौकशीसाठी बोलवते, पण अजित पवार यांना 1400 कोटींच्या मनी लॉन्ड्रीग प्रकरणात का बोलवत नाही? असा सवालही त्यांनी केला
दरम्यान, शरद पवार हे माझ्यापेक्षा 10 वर्षांनी लहान आहेत. आजही लोकांमध्ये काम करत आहे. शरद पवारांनी एवढ्या लवकर निवृत्ती घ्यायला नको होती, त्यांनी घाई केली असेही शालिनीताई पाटील यांनी म्हंटल.