पंढरपूर प्रतिनिधी । राज्यात सध्या कोरोनाने हाहाकार माजवला आहे. कोरोनामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे बंद आहेत. कोरोनाचा प्रभाव आता सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांवरदेखील पडत आहे. आषाढी एकादशी वारी समोर कोरोनामुळे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यापार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्हिडीओ कॉन्फेरंन्सिंगद्वारा एक बैठक घेतली असून यात वारी बाबतचा निर्णय ३१ मे रोजी घेण्याचे ठरवण्यात आले आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विश्वस्तांनी प्रशासनासमोर तीन पर्याय ठेवले असल्याचे समजत आहे. यात 300 वारकरी घेऊन दींडीस परवानगी द्या किंवा 30 , 40 वारकरी घेऊन वाहनात पालखी ठेऊन पंढपुरपर्यत परवानगी द्या नाहीतर मानाच्या दिंड्या आणि विणेकरी यांना परवानगी देऊन कमी वारकरी संख्येत वारी पार पाडता येईल असे तीन पर्यंत प्रशासनासमोर ठेवण्यात आल्याचे समजत आहे.
आषाढी यात्रेच्या नियोजनासंदर्भात उपमुख्यमंत्री पवार यांनी पुणे, सातारा व सोलापूर आदी जिल्ह्यातील प्रशासन व महाराज मंडळ यांचे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. या बैठकीत आषाढी यात्रेसाठी मानाच्या प्रमुख पालख्या पंढरपुरात आल्या पाहिजेत, प्रातिनिधिक स्वरूपात आषाढी यात्रा व्हावी, यात्रेसाठी मानाच्या प्रमुख पालख्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहावे, परंतु शासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे यात्रा व्हावी असे मत मंदिर समितीचे सहाय्यक अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज यांनी मांडले. दरम्यान, आज झालेल्या बैठकीत कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नसून याबाबत पुन्हा मे महिनाअखेर पर्यंत बैठक घेऊन यावर तोडगा काढण्यात येणार आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.