हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाजप सोबत जाण्याच्या चर्चामुळे राजकारण तापले आहे. अशात पवार यांनी काही वेळापूर्वी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून घड्याळाचे चिन्ह हटवल्याने विविध चर्चा रंगल्या आहेत. आता मात्र अजित पवार यांनी नवीन ट्विट केलं असून यामुळे राज्यातील राजकारणात ट्विस्ट निर्माण झाला आहे.
खारघर येथे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी लाखो संख्येनं नागरिक उपस्थित होते. यावेळी अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला,त्यात निष्पाप १३ अनुयायांचा नाहक बळी गेला.ही दुर्दैवी घटना निसर्ग निर्मित नसून मानव निर्मित आपत्ती आहे.या दुर्दैवी घटनेला सरकारच सर्वस्वी जबाबदार आहे असं म्हणत पवार यांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत.
https://twitter.com/AjitPawarSpeaks/status/1648236071128555520
या घटनेसाठी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा. तसंच या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २० लाख, तर उष्माघातामुळे बाधित झालेल्या नागरिकांना मोफत उपचारासह प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्याची मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे अजित पवार यांनी केली आहे.