बीड प्रतिनिधी| राज्य सहकारी बँक कथित घोटाळ्यावर अजित पवार यांनी आज प्रथमच भाष्य केले आहे. त्यांनी आपण या प्रकरणात एक रुपयाने देखील मिंदा नाही असे म्हणले आहे. या घोटाळ्या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेला ५ दिवसात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर अजित पवार यांच्ये नाव माध्यमात झळकू लागले आहे.
बीड येथे शिवस्वराज्य यात्रेत भाषण करताना अजित पवार यांनी याविषयावर भाष्य्य केले आहे. कोर्टाने जो निकाल दिला त्यात ५० लोकांचे नाव आहे. मात्र माध्यमांनी अजित पवारांचे नावच लावून धरले आहे. या ५० लोकांच्या यादीत भाजपचे दिवंगत नेते माजी मंत्री पांडुरंग फुंडकर, शिवसेनेचे माजी केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ यांची देखील नावे आहेत. मात्र अजित पवारांचे नाव माध्यमात सतत झळकत आहे. मात्र अजित पवार या बँकेच्या एका रुपयात देखील मिंदा नाही असे खरमरीत भाष्य अजित पवार यांनी २५ कोटींच्या कर्ज घोटाळ्यावर केले आहे.
तसेच अजित पवार यांनी लोन कमेटीला आणि एक्झिक्युटिव्ह कमेटीच्या एकही बैठकीला आपण हजर नव्हतो. त्यामुळे या घोटाळ्या संदर्भात आपला काहीच संबंध नाहीत. तसेच आपण यात काहीच अपहार केला नाही असे अजित पवार म्हणाले आहेत.