हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आज याच आरोपांवर अजित पवार यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत असताना, “मी भला आणि माझं काम बरं असा माझा स्वभाव आहे. त्यामुळे येरवडा भूकंप प्रकल्पाचा आणि माझा काही संबंध नाही” असे अजित पवारांनी म्हणले आहे. तसेच, अजित पवारांनी बोरवणकर यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
मी भला आणि माझं काम बर..
आजच्या पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार म्हणाले की, “मी भला आणि माझं काम बरं असा माझा स्वभाव आहे. त्यामुळे रिटायर्ड पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या आरोपांचा माझा काही संबंध नाही. मी आजपर्यंत म्हणजे जवळपास 32 वर्षे झाली, माझा स्वभाव जरी कडक असला तरी मी राज्यातल्या अधिकाऱ्यांशी व्यवस्थितपणे बोलत असतो. माझ्याकडे आतापर्यंत अनेक विभागांचा कारभार होता, त्या अधिकाऱ्यांशी मी योग्य पद्धतीने वागलो”
मी चुकीचं काम करत नाही..
त्याचबरोबर, “मी कुणाच्या टीकेला उत्तर देत नाही. मागील 3 ते 4 दिवस माझ्या विरोधात बातम्या येत आहेत. मी त्याला महत्त्व दिलं नाही. माझा त्याचाशी काहीही संबंध नाही. मी अनेकवर्ष पालकमंत्री होतो. मी एवढ्या वर्षात कायद्याच्या चौकटीत न बसणाऱ्या कोणत्याही गोष्टी केल्या नाहीत. जर एखाद्याचं काम होत नसेल तर मी त्याला तोंडावर नाही होत म्हणून सांगतो. पण चुकीचं काही काम करत नाही” असे स्पष्टीकरण देखील अजित पवार यांच्याकडून देण्यात आले.
दरम्यान, “मॅडम कमिशनर” पुस्तकात मीरा बोरवणकरांनी येरवडा जेल परिसरातील जमिनीसंबंधित अजित पवारांवर गंभीर आरोप लावले होते. या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात देखील खळबळ उडाली होती. मात्र आज अजित पवार यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या सर्व आरोपांवर भाषण केले आहे. तसेच, त्यांनी आपल्यावर लावलेले सर्व आरोप फेटाळत या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही असे सांगितले आहे.




