अजित पवारांनी बांधकाम विभागाला झापलं म्हणाले, गाठ माझ्याशी आहे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा परफेक्शनिस्टपणा पुन्हा एकदा दिसून आला. कराड येथील शासकीय विश्रामगृहातील अस्वच्छतेमुळे अजित पवारांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलच झापलं. एवढंच नाही तर अस्वच्छता दिसल्यास माझ्याशी गाठ असे म्हणत चांगलेच धारेवर धरता अधिकाऱ्यांची पाचावर धारण धरली. अन् अजित पवारांची गाडी पुढे जाती न जातीच तो अधिकाऱ्यांना कर्तव्याची जाणीव झाली.

कोयनाधरण प्रकल्पग्रस्तांच्या जमीन वाटपाचा कार्यक्रम आज सकाळी पार पडत आहे. तत्पूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार हे कराड येथे रविवारी सायंकाळी दाखल झाले होते. त्यांनी रात्री सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या घरी स्नेहभोजन केले. त्यानंतर कराड येथील शासकीय विश्रामगृहात मुक्काम केला. आज सोमवारी दि. 16 रोजी कोयनानगरला रवाना झाले. तत्पूर्वी शासकीय विश्रामगृहाची अजित पवार यांनी पाहणी केली.

अजित पवार यांनी पाहणी केल्यानंतर गाडी बसताना बांधकामच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. शासकीय विश्रामगृहाची स्वच्छता झाल्याची मला जर नाही दिसली तर माझ्याशी गाठ असे अधिकाऱ्यांला सांगितले. यावेळी अजित पवार यांच्या गाडीमध्ये खासदार श्रीनिवास पाटील, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील होते.

नविन इमारतीला उदघाटना आधीच चिरा

कराड येथे माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून शासकीय विश्रामगृहासाठी नविन इमारत उभी करण्यात आली आहे. तेव्हा या इमारतीकडे पाहताच अजित पवार म्हणाले, अरे बापरे किती चिरा आहेत. तेव्हा आतातरी नविन इमारतची उदघाटना आधीच दुरवस्था झाल्याचे समोर आले आहे.

Leave a Comment