अजित पवारांनी घेतले क्रांतिकारकांच्या बाप्पाचे दर्शन; रंगारी भवनाला देखील दिली भेट

ajit pawar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी विशाखा महाडिक। हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब गणपती ट्रस्टच्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी रविवारी भाविकांनी अलोट गर्दी पहायला मिळाली. दरम्यान अनेक नेतेमंडळी, सिने कलाकारांनी देखील बाप्पाचे दर्शन घेतले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, भाजप प्रवक्त्या चित्रा वाघ, आमदार रविंद्र धंगेकर, काँग्रेसचे नेते मोहन जोशी, राज्य शासनाच्या गृह विभागाचे सह सचिव कैलास गायकवाड, पुणे ग्रामीणचे अप्पर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे, अशा अनेक नेतेमंडळी बाप्पासमोर नतमस्तक झाले. तर आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही बाप्पाच्या दर्शनासाठी हजेरी लावली.

https://www.instagram.com/p/CxmoGvEIwxr/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्या बाप्पाचे दर्शन घेतले. मनोभावे बाप्पाची आरती केली आणि यासह त्यांनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवनासदेखील भेट दिली. यावेळी अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर देखील उपस्थित होत्या. अजित पवारांच्या स्वागतासाठी ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’चे विश्वस्त आणि उत्सव प्रमुख पुनीत बालन स्वतः उपस्थित होते.

https://www.instagram.com/reel/CxnLYp4PCRf/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==

यावेळी उत्सव प्रमुख पुनीत बालन यांनी अजित पवार यांना रंगारी भावनांबद्दल इतंभूत माहिती दिली. क्रांतिकारकांचे माहेर घर अशी या रंगारी भवनाची ओळख आहे. यावेळी अजित दादांनी अत्यंत बारकाईने संपूर्ण भवनाची पाहणी केली आणि त्याचसोबत प्रत्येक बारीक गोष्टीविषयी जाणून घेतले. शिवाय यावेळी भवनाची राखण आणि जतन केल्याबद्दल अजित दादांनी आवर्जून मंडळाचे आणि कार्यकर्त्यांचे कौतुक केले. हिंदूस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्या बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर अजित पवार यांनी पुण्यातील इतरही मानाच्या मंडळांना आवर्जून भेट दिली.