अजित पवार तुरुंगात जाणार; नव्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ

Ajit Pawar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राष्ट्रवादीत बंड करत उपमुख्यमंत्री अजित पवार शिंदे – फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार (sharad Pawar) गटाला टक्कर देण्यासाठी अजित पवार (Ajit Pawar) गटाने कंबर कसली आहे. सध्या अजित पवार गट संघटन बांधणीसाठी बैठका घेताना दौरे करताना दिसत आहे. अशातच माजी मंत्री शालिनीताई पाटील (Shalinitai Patil)  यांनी अजित पवारांविषयी एक मोठा दावा केला आहे. पुढील 3 महिन्यातच अजित पवार तुरुंगात दिसतील, असे शालिनीताई पाटील यांनी म्हटले आहे. या दाव्यामुळे राजकिय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

अजित पवारांवर टीका करताना शालिनीताई पाटील यांनी म्हणाल्या की, अजय पवार आणि शरद पवार यांच्या बंडामध्ये जमीन आसमानाचे अंतर आहे. शरद पवारांचे बंड पक्षातील आमदार दुसरीकडे जाऊ नये यासाठी असते. तर अजित पवारांचे बंडा स्वार्थासाठी होते. अजित पवार यांना मुख्यमंत्री पद हवे होते त्यामुळे त्यांनी बंड केला. तसेच, अजित पवार यांना 2024 मध्ये लोकसभा विधानसभा या कोणत्या निवडणुका लढवता येणार नाही कारण पुढील तीन महिन्यातच पवार तुरुंगात दिसतील, असा मोठा दावा शालिनीताई पाटील यांनी केला आहे.

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, अजित पवारांच्या विरोधात उच्च न्यायालयात मी तीन अर्ज दाखल करणार आहेत. दहा दिवसात हे अर्ज दाखल देखील होतील. हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार अजित पवार हे शिखर बँकेच्या २५ हजार कोटींच्या घोटाळ्यातील मुख्य सुत्रधार आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारच्या मुख्य सचिवांवर पहिला अर्ज असा असेल की, याप्रकरणी ताबडतोब दोषारोपपत्र ठेवा. आता आम्ही एफआयआर दाखल केली आहे. त्यांच्यावर चार्जशीट ठेवा आणि अजित पवारांना न्यायालयात उभं करा.

इतकेच नव्हे तर, “आम्ही हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात घेण्याची विनंती आम्ही न्यायालयात करणार आहोत. दुसऱ्या अर्जात आम्ही, माझी प्रॉपर्टी ईडीच्या ताब्यात आहे ती प्रॉपर्टी आमच्या ताब्यात द्यावी, अशी मागणी करणार आहोत. माझा मोदींवर माझा विश्वास राहिला नाही, शिंदे-फडणवीस सरकार व्यवस्थित चाललं असताना अजित पवारांना उपमुख्यमंत्री केलं हे योग्य नाही” अशा शब्दात त्यांनी टीका केली.