महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप!! अजित पवार सरकारमध्ये सामील होणार; उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या राजकारणात पुनः एकदा मोठा भूकंप झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) हे शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सामील होणार आहेत. आज सकाळी अजितदादांच्या देवगिरी या बंगल्यावर राष्ट्रवादीच्या काही आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर अजित पवार हे सरकारमध्ये सामील होऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे एकूण ९ मंत्री शपथ घेणार आहेत. TV९ मराठीने याबाबतचे वृत्त दिले आहे.  राष्ट्रवादी काँग्रेससह भाजप आणि शिंदे गटाचे सर्व नेतेमंडळी राजभवनावर दाखलही झाले आहेत.

अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण ५४ आमदारांपैकी ३० आमदारांचे पाठबळ असण्याची शक्यता आहे. यामध्ये दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, अमोल मिटकरी, अतुल बेनके, रामराजे निंबाळकर, मकरंद पाटील यांच्यासह अनेक आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप घडला आहे. अजित पवार आणि छगन भुजबळ आजच शपथ घेण्याची शक्यता आहे. या नव्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार असे 2 उपमुख्यमंत्री असतील.

अजित पवारांच्या या शपथविधीला शरद पवार यांचा मात्र पाठिंबा नाही. त्यामुळे अजित पवारांनी थेट शरद पवारांचा छेद दिलाय हे स्पष्ट झालय. विशेष म्हणजे शरद पवारांचे निकटवर्तीय मानले जाणारे प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ यांसारखे दिग्गज नेतेही अजित पवारांसोबत असल्याने चर्चाना उधाण आलं आहे.  गेल्या काही दिवसांपासून अजित पवार भाजपमध्ये जाणार किंवा सरकारमध्ये सामील होणार अशा चर्चा सुरु होत्या. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसककडून प्रत्येक वेळी या चर्चांचे खंडन करण्यात आलं. आता मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच २ गट पडल्याचे सिद्ध झालं आहे. त्यामुळे शिवसेनेच्या बाबतीत जे घडलं तेच आता राष्ट्रवादी सोबत घडलं असं म्हंटल तरी काही हरकत नाही.