मुंबई । महाराष्ट्र अर्थसंकल्प 2021-22 (Maharashtra Budget 2021) उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला. राज्यातील महाविकासआघाडी सरकारचा हा दुसरा अर्थसंकल्प आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुपारी दोन वाजता विधानसभेत अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली. अर्थराज्यमंत्री शंभूराज देसाई हे विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर करतील. यावेळी महिलेच्या नावानं घर घेतल्यास मुद्रांक शुल्कात सूट देण्यात येणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली.
आज जागतिक महिला दिवस आहे. त्यानिमित्ताने राज्याच्या अर्थसंकल्पात जिजाऊ गृहस्वामिनी योजनेची या खास योजनेचे लोकार्पण करण्यात आले. अनेक महिलांची मागणी होती कि घराच्या कागदपत्रांवर महिलांचे नाव असावे. त्यानुसार घरच्या लक्ष्मीला खऱ्या अर्थाने घरातील लक्ष्मी करण्याबाबत आपण पाऊल उचलत आहोत असे मत पवार यांनी व्यक्त केले. राज्यातील माता-भगिणी, युवती-विद्यार्थींना शुभेच्छा देऊन अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडण्यासाठी सुरुवात केली. महाराष्ट्राच्या अर्थकारणात महिलांचा विशेष सहभाग असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यासोबत शाळेत येण्या-जाण्यासाठी बारावीपर्यंतच्या मुलींना मोफत बस प्रवास उपलब्ध करून देण्यात येणार आहे. केंद्राकडून महिला व बालविकास विभागासाठी 1398 कोटी इतका निधी मंजूर झाला आहे. तसेच संत जनाबाई सामाजिक सुरक्षा योजनेची घोषणाहि करण्यात आली आहे. 250 कोटींचे बीज भांडवल याद्वारे उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. घरकाम करणाऱ्या महिलांसाठी जनाबाई सामाजिक सुरक्षा योजना अमलात आणली जाणार आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.