राष्ट्रवादीच्या पोस्टर वरून अजित पवारांचा फोटो गायब?? चर्चांना उधाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसची दिल्लीत महत्त्वाची बैठक असून राष्ट्रवादीचे राज्यातील महत्त्वाचे नेते बैठकीला उपस्थित आहेत. परंतु विशेष म्हणजे राष्ट्रवादी कार्यालयाबाहेरील स्वागतासाठी लावण्यात आलेल्या पोस्टर मधून चक्क उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाच फोटो गायब झाल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या असून चर्चाना उधाण आले आहे.

या पोस्टर वर शरद पवार यांच्यासह नेते प्रफुल्ल पटेल, महाराष्ट्रातील सर्व मंत्र्यांचे फोटो झळकत आहेत. मात्र उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे महत्त्वाचे नेते अजित पवार यांचाच फोटो बॅनरमधून गायब आहे. अजित पवार हे राष्ट्रवादीतील महत्त्वाचे नेते मानले जातात. मात्र स्वागताच्या बॅनरमधून त्यांचा फोटोच वगळल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

दरम्यान, या बैठकीत काय चर्चा करण्यात येणार आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही. प्राथमिक माहितीनुसार सध्याच्या राजकीय परिस्थितीवर या बैठकीत चर्चा केली जाईल. या बैठकीत यूपीए किंवा ममता बॅनर्जी हा मुद्दा नसून फक्त सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा केली जाणार असल्याचे राष्ट्रवादीकडून सांगितलं जात आहे.

Leave a Comment