पहिल्या भेटीत नवनिर्वाचित राज्यपाल कसे वाटले? अजित पवारांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनी बैठक आयोजित केली. या बैठकीनंतर महाविकास आघाडीतील शिष्टमंडळातील नेत्यांनी नवनिर्वाचित महामहिम राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. या भेटीबाबत राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी अजित पवार यांनी म्हंटले की, आम्ही प्रथम राज्यपालांची भेट घेतली. भेट अतिशय चांगली झाली. भेटीनंतर आम्ही सगळे समाधानी आहोत. त्यांनी आम्हाला सांगितलं की राज्यात सत्ताधारी आणि विरोधी पक्ष असले तरी सगळ्यांनी मिळून मिसळून पुढं जायचं असतं. आशी सकारत्मक भूमिका नवनिर्वाचित राज्यपालांची आम्हाला वाटली. रमेश बैस यांनी अनेक वर्ष रायपूरमधून खासदारकी केली. याशिवाय ते त्रिपुरामध्ये राज्यपाल होते. आता महाराष्ट्रात आले आहेत. आमची आजची चर्चा अतिशय समाधानी झाली.

नवनिर्वाचित महामहिम राज्यपाल रमेश बैस यांनी नुकतीच राज्यपालपदाची सूत्रे स्विकारली आहे. त्याच्या राज्यपालपदाच्या शपथसमारोहास महाविकास आघाडीतील नेते उपस्थित राहिले नव्हते. त्यामुळे त्यांनी आज नवनिर्वाचित राज्यपालांची भेट घेतली.