मुंबई प्रतिनिधी |मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांची महाराष्ट्राच्या मुख्य सचिव पदी नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे. देशात लोकसभेची आचारसंहिता सुरु असल्याने त्यांची या पदी नियुक्ती नकरता त्यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला. त्याला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे अजोय मेहता यांची येत्या एक दोन दिवसात राज्यांच्या मुख्य सचिव पदी नेमणूक केली जाण्याची शक्यता आहे.
सलमान खानला व्हायचे आहे लग्नाआधीच बाप
सर्वाधिक काळ मुंबईचे मुख्य सचिव म्हणून काम पाहिलेल्या अजोय मेहता यांनी कार्यक्षम अधिकारी म्हणून लौकिक मिळवला आहे. त्यांच्या याच प्रतिमेला पाहून राज्य शासनाच्या वतीने त्यांची या पदी नेमणूक केली जाण्याची शक्यता आहे. मार्च २०१९ मध्ये अर्थ विभागाचे सचिव युपीएस मदान यांची मुख्य सचिव पदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी स्वच्छानिवृत्ती घेण्याचा निर्णय घेतल्याची देखील चर्चा आहे. ते येत्या सप्टेंबर महिन्यात निवृत्त होणार होते. त्यांनी स्वच्छानिवृत्ती घेतली नाही तर त्यांना महामंडळावर संचालक म्हणून देखील नेमले जाऊ शकते. त्यामुळे अजोय मेहता यांची निवड निश्चित मानली जात आहे.
मोदींच काय, भाजपचा कोणताच नेता २३ मेनंतर पंतप्रधान होणार नाही
अजोय मेहता हे १९८४ सालीच्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी २०१५ साली मुंबई महानगर पालिकेच्या आयुक्त पदाची जबाबदारी स्वीकारली होती. सर्वाधिक काळ मुंबईचे पालिका आयुक्त म्हणून त्यांच्या नावाची नोंद आहे. शिवसेनेवर वचक ठेवण्यासाठी त्यांची या पदी नियुक्ती करण्यात आली होती. आता त्यांना याच कामाची बक्षिशी म्हणून राज्याचे मुख्यसचिव देण्यात येणार आहे अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
पत्नीचे प्रियकरासोबतचे फोटो पाहून पतीने केले सपासप वार
‘या’ मतदारसंघात शिवसेनेचा होऊ शकतो ‘धक्कादायक’ पराभव
प्रियंका चोप्राचे ‘या’ अभिनेत्यासोबत हि होते ‘झंगाट’
अयोध्या प्रकरण : सर्वोच्च न्यायालयाने दिली मध्यस्तीसाठी १५ ऑगस्टची मुदत