टेस्लाच्या भारतातील एंट्रीबाबत ट्वीट करताना एलन मस्क यांनी लिहिले,”As Promised”

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । एलन मस्क यांनी एका ट्विटमध्ये याची पुष्टी केली आहे की, भारतातील 5 राज्यांमध्ये त्यांच्या कंपनी टेस्लाची योजना आहे. अलीकडेच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनलेल्या एलन मस्क यांच्या टेस्लानेही भारतात रजिस्ट्रेशन केले आहे. वास्तविक, टेस्लाच्या भारतातल्या योजनेविषयी माहिती देण्यात आली आहे. यावेळी असे सांगितले गेले आहे की, टेस्ला कार महागड्या आहेत. परंतु भारतात टेस्लाचे उत्पादन सुरू होताच, त्या मध्यमवर्गीयानांही परवडतील. या ब्लॉगने आपली लिंक ट्विटरवर शेअर केली आहे. यावर एलन मस्क यांनी प्रतिक्रिया देखील दिली आहे. मंगळवारी कर्नाटकच्या बेंगलुरुमध्ये रजिस्ट्रेशन झाल्यानंतर एलन मस्क यांची ही पहिलीच प्रतिक्रिया आहे.

https://twitter.com/Tesmanian_com/status/1349357761633533953?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1349367758102929411%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es2_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fnews%2Fbusiness%2Felon-musk-first-reaction-after-tesla-india-registration-replies-to-a-tweet-and-says-as-promised-ndav-3416539.html

टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क यांनी आपल्या रिप्लाय मध्ये ‘As Promised’ असे उत्तर दिले. गेल्या काही वर्षांत मस्कने आपल्या भारताविषयीच्या योजनेविषयी अनेकदा ट्विट केले होते. ऑक्टोबर 2020 मध्ये केलेल्या एका ट्विटमध्ये त्यांनी लिहिले होते की, ‘Next Year, Done.’ मस्क यांचे हे ट्विट टी-शर्टच्या एका छायाचित्रासह करण्यात आलेले होते. या टी-शर्टवर असे लिहिले होते की, india wants Tesla म्हणजेच भारताला टेस्ला हवा आहे.

https://t.co/dAN1K00Y9z?amp=1

पाच राज्यांमध्ये प्रोडक्शन फॅसिलिटीसाठी स्टोअर्स उघडण्याची तयारी
टेस्लासंदर्भातील या नव्या योजनेत कंपनीकडून पाच राज्यांत आपले स्टोअर्स उघडण्यासाठी चर्चा सुरू असल्याचे सांगितले गेले आहे. या स्टोअर्स व्यतिरिक्त, टेस्ला प्रोडक्शनसाठी आपले ऑफिस, रिसर्च अँड डेव्हलमेंट सेंटर तसेच फॅक्टरी उघडण्याची योजना आखत आहे. टेस्ला हा ‘श्रीमंत वर्गाचा’ असल्याचेही यात नमूद केले आहे. तर, भारतात बरीच आर्थिक असमानता आहे.

https://t.co/4jqzCUblyj?amp=1

या ब्लॉगमध्ये असे सांगितले गेले होते की, अनेक लोकांचा असा विश्वास आहे की, जर एखाद्या देशात मोठ्या संख्येने लोक गरीब असतील तर ते टेस्लासाठी बाजारपेठ असू शकत नाही. मात्र, हे देखील समजून घेणे आवश्यक आहे की, कंपनी आपली कार त्या देशातील संपूर्ण लोकसंख्येला विकण्याचे लक्ष्य ठेवणार नाही. भारताची लोकसंख्या 1.387 अब्ज आहे, म्हणून कंपनी आर्थिकदृष्ट्या बळकट असलेल्या या लोकसंख्येच्या अल्प भागाला ते लक्ष्य करीत आहेत.

https://t.co/95TzJA5NFu?amp=1

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.